ZP Bharti 2024 | जिल्हा परिषद येथे 15,000 पगारासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

 ZP Bharti 2024  जिल्हा परिषद येथील भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता आनंदाची बातमी आहे. कारण जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून 05 रिक्त जागांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद पॅनल वरील विविध पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून भरती घेण्यात येणार आहे. 6 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानुसारच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.

  • जिल्हा परिषद, अमरावती येथील भरती मधून 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • जिल्हा परिषद, अमरावती येथील भरती मधून ” विधी तज्ञ ” या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

Table of Contents

[ ZP Bharti 2024 ] जिल्हा परिषद, अमरावती येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे.

  • जिल्हा परिषद पॅनल वरील विधी तज्ञ न्यायालय खंडपीठ नागपूर, जिल्हा परिषद पॅनल वरील विविध तज्ञ तालुकास्तर या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता वयोमर्यादा जिल्हा परिषद, अमरावती यांच्याकडून कळविण्यात आलेली नाही. यासंदर्भात अधिक माहितीसाठी आपण मूळ जाहिरात वाचू शकता.
  • सदरील भरतीसाठी  ZP Bharti 2024  अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून LLB किंवा त्यापेक्षा जास्त पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा येथे नोंदणी असावी.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे न्यायालयामध्ये 10 वर्षे काम केलेला अनुभव असावा.
  • जिल्हा परिषद वरील विधी तज्ञ उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 15,000 रुपये वेतन देण्यात येईल.
  • जिल्हा परिषद वरील विधी तज्ञ तालुका स्तर या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 7500 रुपये वेतन देण्यात येईल.
  • सदरील जिल्हा परिषद भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण अमरावती असणार आहे.
  • कोणत्याही प्रकारची शुल्क जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून अर्ज करणाऱ्या किंवा इच्छुक उमेदवारांकडून आकारण्यात येणार नाही.
  • जिल्हा परिषद अमरावती येथील विधी तज्ञ पदाच्या भरती करिता उमेदवारांनी ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
  • ” उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा ) जिल्हा परिषद, अमरावती ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • 6 ऑक्टोबर 2024 ही जिल्हा परिषद, अमरावती यांच्याकडून देण्यात आलेली अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज करावा.
  • जिल्हा परिषद अमरावती येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ZP Bharti 2024
ZP Bharti 2024

[ ZP Bharti 2024 ] जिल्हा परिषद अमरावती येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील नियम वाचा.

  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून अर्ज करायचा आहे.
  • जिल्हा परिषद, अमरावती यांच्याकडून कोणत्याही प्रकारची ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत राबवण्यात आलेली नाही.
  •  ZP Bharti 2024  या भरतीचा अर्ज भरत असताना सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक अर्ज भरावा. उमेदवारांनी आपले नाव, शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, वडिलांचे नाव, पत्ता, पिनकोड ही सर्व माहिती योग्य आणि बरोबर भरावी. चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
  • जिल्हा परिषद अमरावती येथील भरतीची 6 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख आहे.
  • भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांनी जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचली आणि त्यानंतर अर्ज करावा.

[ ZP Bharti 2024 ] जिल्हा परिषद, अमरावती येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

  • सदरील भरती मधून अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल. अर्ज न केलेल्या कोणत्याही उमेदवाराची थेट निवड करण्यात येणार नाही.
  • जिल्हा परिषद, अमरावती यांच्याकडून उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
  • सदरील भरती  ZP Bharti 2024  मध्ये पदावर नियुक्त होण्याकरिता उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये. असे आढळल्यास त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी मुलाखतीचे ठिकाण ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार जिल्हा परिषद, अमरावती यांच्याकडे राहील.
  • जिल्हा परिषद अमरावती येथील भरतीची अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

[ ZP Bharti 2024 ] जिल्हा परिषद, अमरावती येथील भरती मधून भरण्यात येणाऱ्या पदांचे विवरण खालील प्रमाणे.

  • जिल्हा परिषद, अमरावती येथील भरती मधून जिल्हा परिषद पॅनल वरील विविध तज्ञ उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर या पदासाठी 02 जागा भरण्यात येणार आहेत. तर जिल्हा परिषद पॅनल वरील विधी तज्ञ तालुका स्तर या पदासाठी एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • जिल्हा परिषद अमरावती येथील पॅनल वरील विधी तज्ञ या पदाकरिता एकूण 05 जागा रिक्त आहेत.
  • सदरील भरती मधून राखीव प्रवर्गातील जागेचे नियोजन जाहिरातीमध्ये देण्यात आलेले नाही. त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याकरिता संकेतस्थळाला भेट द्या.
  • सरकारी नोकर भरतीच्या सर्व अपडेट साठी येथे क्लिक करा.

[ ZP Bharti 2024 ] जिल्हा परिषद, अमरावती येथील भरतीसाठी सादर करायची कागदपत्रे खालील प्रमाणे.

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे LLB किंवा इतर कायद्याच्या पदवीचे प्राप्त शैक्षणिक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचा परवाना असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे न्यायालयात वकिली केलेल्या चा 10 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्या अनुभवाचे अनुभव प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे रहिवासी प्रमाण पत्राची स्वयं स्वाक्षरी केलेली प्रत उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने सादर केलेली सर्व कागदपत्रे पडताळली जातील.

[ ZP Bharti 2024 ] जिल्हा परिषद, अमरावती येथील भरतीसाठी अटी व शर्ती खालील प्रमाणे.

  • एखदा उमेदवारांची नियुक्ती जिल्हा परिषद, अमरावती यांच्या पॅनलवर झाल्यानंतर त्या उमेदवाराला जिल्हा परिषद, अमरावती यांच्या विरोधात असणारे कोणतेही प्रकरण स्वीकारता येणार नाही.
  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती यांचा वकील नियुक्ती संदर्भात निर्णय न्यायालयीन प्रकरणाबाबत अंतिम असेल.
  • अमरावती जिल्हा परिषद येथील नियुक्त वकिलांना ठरवून दिलेले मानधन मिळेल. या व्यतिरिक्त इतर वाढलेला खर्च जिल्हा परिषदे करून देण्यात येणार नाही.
  • न्यायालयातील प्रकरणे चालविण्याकरिता लागलेली वकील फी, किरकोळ खर्च हे निकालाच्या अंतिम दिवशी संबंधित खात्याच्या खाते प्रमुखाकडून अदा करण्यात येईल.
  • न्यायालयीन प्रकरणासंदर्भात झालेल्या कोणत्याही खर्चाची पावती उमेदवारांनी जमा करायची आहे. या पावती ची पडताळणी करण्याचा पूर्णपणे अधिकार कार्यकारी अधिकाऱ्यांकडे राहील.
  • नवीन प्रकरणासाठी वकिलांची नियुक्ती करणे किंवा चालू प्रकरणांमधील वकील बदलणे केव्हा प्रकरण दुसऱ्या वकिलाकडे चालवायला देणे पूर्णपणे हक्क मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती यांच्याकडे असेल.
  • नियुक्त झालेल्या उमेदवारांना 10 दिवस अगोदर ₹100 च्या स्टॅम्प पेपर वरती सर्व अटी व शर्ती मान्य असल्याचे लिहून देणे बंधनकारक आहे.
  • उमेदवाराकडे सोपवलेल्या सर्व कामाचा अहवाल उमेदवारांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती त्यांच्याकडे सादर करायचा आहे. नियुक्त केलेल्या उमेदवाराचे काम असमाधानकारक वाटल्यास उमेदवाराला पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात येईल.
  • नियुक्त उमेदवाराला आवश्यक असणारे सर्व दस्तावेज संबंधित विभागाकडून मिळतील. कोणतेही दस्तावेज संबंधित विभागाकडून मिळत नसल्यास तातडीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज देण्यात आलेल्या विहित नमुन्यामध्ये करावा.
  • या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचा कालावधी तीन वर्षाचा राहील. कालावधी पूर्ण झाल्यानंतर कालावधी वाढविण्याचा निर्णय पूर्णपणे समितीकडे राहील.

[ ZP Bharti 2024 ] जिल्हा परिषद, अमरावती येथे संपर्क साधण्यासाठी उमेदवारांनी खालील माहितीचा आधार घ्यावा.

  • ‘ कॅम्प रोड, अमरावती 444 601’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • 0721 2662012 / 2662932 या दूरध्वनी क्रमांकावर काही शंका असल्यास उमेदवारांनी संपर्क साधायचा आहे.
  • dyceogadzpamt@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी काही शंका असल्यास संपर्क साधायचा आहे.
  • जिल्हा परिषद, अमरावती यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी उमेदवारांनी येथे क्लिक करा.

[ ZP Bharti 2024 ] जिल्हा परिषद, अमरावती येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • 6 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 6 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरचा अर्ज करावा. मूळ जाहिरात वाचण्याकरिता येथे क्लिक करा.

[ ZP Bharti 2024 ] जिल्हा परिषद, अमरावती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील विदर्भामध्ये अतिशय विस्तृतपणे पसरलेला आहे. अमरावती जिल्ह्याचे टोपण नाव ‘ अंबा नगरी’ असे आहे. पुराण काळातील इतिहासानुसार रुक्मिणीला श्रीकृष्णाने याच नगरीतून पळवून नेऊन तिच्यासोबत विवाह केलेला होता. या शहराचे मूळचे नाव ’उम्ब्रवती’ असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश म्हणून या शहराचे ‘ अमरावती ‘ असे नाव पडण्यात आले. या शहरामध्ये अंबादेवी चे प्रसिद्ध मंदिर आहे. या देवीच्या नावानुसार शहराचे नाव अमरावती असे पडले आहे.

इसवीसन 1097 रोजीचे शिलालेख या अमरावती शहरांमध्ये आहेत. त्याचप्रमाणे या शहरांमध्ये दगडाचे पुतळे आहेत. या पुतळ्या मध्ये भगवान आदिनाथ आणि ऋषभ नाथ यांचा समावेश आहे. अमरावती शहर हे महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागामध्ये आहे. याच जिल्ह्यामध्ये मुंबई – कोलकाता हायवे मार्ग आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेला अकोला आणि बुलढाणा जिल्हा आहेत. निमाड, बेतूल व छिंदवाडा हे मध्यप्रदेश मधील जिल्हे अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात आहेत. वर्धा व नागपूर हे जिल्हे अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागात आहेत. तर यवतमाळ आणि वाशिम हे जिल्हे दक्षिणेस आहेत.

अमरावती जिल्ह्याची लांबी 193 किलोमीटर पूर्व-पश्चिम आहे. 145 किलोमीटर रुंदी दक्षिण उत्तर अमरावती जिल्ह्याची आहे. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 3.97 टक्के क्षेत्रफळ फक्त अमरावती जिल्ह्याचे आहे. महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 3.07 टक्के क्षेत्रफळ फक्त अमरावती जिल्ह्याचे आहे.

Leave a Comment