The Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक येथे निघालेल्या भरती संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या होणाऱ्या भरती मधून वसुली अधिकारी, क्लार्क आणि शिपाई या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. 30 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या होणाऱ्या भरती मधून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांना भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची आहे आशा उमेदवारांनी निफाड अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. अधिक माहिती करिता खाली देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक उमेदवारांनी वाचावी.
- 05 रिक्त जागा भरण्याकरिता निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक यांच्याद्वारे भरतीचे आयोजन केलेले आहे.
- निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक येथील भरती मधून वसुली अधिकारी, क्लार्क, शिपाई या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
भारत डायनामिक्स लिमिटेड येथे भरती.
The Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 | निफाड अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.
- वसुली अधिकारी या पदाकरिता अर्ज करणाऱ्या इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बीए किंवा बी.कॉम पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे नागरी सहकारी बँकेमध्ये वसुली विभागात काम केल्याचा 8 ते 10 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. सदरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 45 वर्षापर्यंत असावे.
- क्लार्क या पदाकरिता अर्ज अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बीए , बीकॉम, बीसीए या पदांपैकी कोणतीही एक पदवी मिळवलेले असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे जर नागरी सहकारी बँक या ठिकाणी काम करण्याचा अनुभव असेल तर आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 28 वर्षापर्यंत असावे.
- शिपाई या पदाकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे जीप ड्रायव्हिंग करण्याचे लायसन असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ड्रायव्हिंग करण्याचा दोन ते चार वर्षाचा अनुभव. या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 28 वर्षापर्यंत असावे.
- वसुली अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता वेतन निगोशिएबल असणार आहे. त्याचप्रमाणे क्लार्क आणि शिपाई या पदांकरिता बँकेच्या वेतन श्रेणीनुसार वेतन देण्यात येईल.
- क्लार्क आणि शिपाई या पदांसाठी आवश्यकता भासल्यास लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत मिळालेल्या मार्कच्या मेरिट नुसार उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
- क्लार्क आणि शिपाई या पदांकरिता प्रोबेशन पिरियड एक वर्षाचा म्हणजेच 12 महिन्यांचा असणार आहे.
- ज्या उमेदवारांना सदरील The Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 भरती करिता अर्ज करायचा आहे अशा सर्व उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2024 या तारखेच्या अगोदर आपले अर्ज जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
- ” दी. निफाड अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड निफाड, जि. नाशिक, शांतीनगर त्रिपोली, स्टेट बँक शेजारी, निफाड, जिल्हा नाशिक” या पट्ट्यावर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज पत्राद्वारे पाठवायचे आहेत.
- निफाड अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.
The Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 | निफाड अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील The Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. त्याचप्रमाणे इच्छुक असलेले उमेदवार पोस्टाद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून आपले अर्ज जमा करू शकतात.
- निफाड अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कोणीही ऑनलाईन पद्धतीद्वारे अर्ज करायचे नाहीत. त्याचबरोबर उमेदवारांनी इतर कोणत्याही फसव्या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अर्ज करायचे नाहीत. असे करणाऱ्या उमेदवाराची फसवणूक झाल्यास त्याला निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक जबाबदार असणार नाही.
- निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील The Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना भारतामध्ये कसल्याही स्वरूपाची खडाखोड करू नये. अर्जामध्ये संपूर्ण गोष्टी अचूक आणि बरोबर लिहायचे आहेत. चुकीच्या गोष्टी लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- निफाड अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक येथील The Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेली आहे.
- निफाड अरबन को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरचा अर्ज करायला सुरुवात करावी. जाहिरातीची पीडीएफ वरती देण्यात आलेली आहे.
The Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 | निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील The Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र ठरणार आहेत. अर्ज न करणाऱ्या उमेदवारांना डायरेक्ट पदावर घेतले जाणार नाही.
- निफाड अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीमध्ये सहभाग घेणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला बँकेकडून कसल्याही स्वरूपाचा TA / DA देण्यात येणार नाही. याची अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील भरती मध्ये कोणत्याही उमेदवाराने जर अनुचित प्रकार केला तर आशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे अशा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.
- निफाड अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन उमेदवार सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.
The Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 | निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक यांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा.
- नाशिक जिल्ह्यामधील सहकारी बँकांमध्ये नामांकित असलेली बँक म्हणजे निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही बँक आहे. या बँकेद्वारे बँकेच्या खातेदारांना आवश्यक बँकिंग सुविधा आणि कर्ज योग्य व्याज दरामध्ये देण्यात येते. या बँकेच्या एकूण खातेदारांपैकी अधिकतम खातेदार हे नाशिक जिल्ह्यामधील निफाड या ठिकाणचे आहेत. नागरिकांना उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा या बँकेने आतापर्यंत दिलेले आहेत. 1985 रोजी निफाड अरबन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेची स्थापना झालेली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची प्रगती होण्याकरिता त्यांना चांगल्या पद्धतीने आर्थिक सहाय्यक मिळणे आवश्यक आहे. त्या करिता निफाड अरबन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड यांची स्थापना झालेली आहे. या बँकेद्वारे उमेदवारांना बचत योजना आणि कर्ज सुविधांचा लाभ देण्यात येतो.
- निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याद्वारे बचत खाते, फिक्स डिपॉझिट योजना, कर्ज सुविधा, प्रवासी व परकीय मुद्रा सेवा, ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल सेवा या प्रमुख सेवा या बँकेद्वारे दिल्या जातात.
- खातेदारांना बचती मधून आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याकरिता बँकेद्वारे सुरक्षित अशी बचत खाती देण्यात येत असतात. खातेदार कांच्या व्यवहारा नुसार त्यांना वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज आणि व्यावसायिक कर्ज यान प्रकारचे कर्ज त्याच्या पात्रतेनुसार देण्यात येत असतात.
- ज्या नागरिकांना परदेशात जायचे आहे किंवा ज्या नागरिकांना परदेशात प्रवास करायचा आहे आशा उमेदवारांना परकीय चलन देण्यात येते. त्याची सुविधा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक द्वारे देण्यात आलेली आहे.
- आजकाल होणाऱ्या ऑनलाईन पेमेंट ची गरज लक्षात घेता निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याद्वारे सुद्धा ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.