SSC Bharti 2024 | कर्मचारी निवड आयोग येथे 05 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी .

SSC Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण कर्मचारी निवड आयोग यांच्या अंतर्गत होणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” लेखापाल ” या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे. 10 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीद्वारे करायचे आहेत. कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी खाली देण्यात आलेला लेख वाचावा.

  • 05 रिक्त जागा भरण्याकरिता कर्मचारी निवड आयोग यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

     

  • कर्मचारी निवड आयोग येथील SSC Bharti 2024 भरती मधून ” लेखापाल ” पदासाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

NCL इंडिया लिमिटेड येथे भरती.

SSC Bharti 2024 | कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे आहे.

  • सदरील SSC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी शासकीय सेवेमध्ये अप्पर डिव्हिजन क्लर्क म्हणून कमीत कमी 10 वर्षे काम केलेला अनुभव असावा. कॅश आणि अकाउंट वर्क या प्रकारचे काम उमेदवाराने त्याच्या नोकरीच्या दरम्यान काय केलेले असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अकाउंट आणि बजेट चे काम करण्याचे अनुभव असावा.

     

  • सदरील SSC Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 9300 ते 34800 रुपये वेतन मिळणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना 4,200 ग्रेड पे मिळणार आहे.

     

  • कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 56 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

     

  • सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑफलाइन जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.

     

  • ” अवर सचिव ( स्थापना ), ब्लॉक क्रमांक 12, सी जियो कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- 110003″ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.

     

  • सदरील होणाऱ्या भरती मधून पाच रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सुरुवातीला या पाच जागा तीन वर्षाच्या करार पद्धती वरती भरण्यात येणार आहेत. कालांतराने त्यांचा कार्यकाल वाढवण्यात येणार आहे पण सात वर्षांपेक्षा जास्त कोणत्याही उमेदवाराला नियुक्ती देण्यात येणार नाही. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 56 वर्षापर्यंत असावे. वयाची मर्यादा उमेदवाराने अर्ज करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत पूर्ण केलेली असावी.

     

  • अर्ज करण्याचा नमुना स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याद्वारे जाहिरातीच्या शेवट देण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच उमेदवारांनी सदरील भरती करिता अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे उमेदवारांनी जमा करायचे आहेत.

     

  • मागवलेल्या अर्जामध्ये कोणत्याही उमेदवाराने जर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसतील तर आशा उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यायची आहे.

     

  • अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायच्या अंतिम दिवसाच्या अगोदर स्वतःचे अर्ज कसे पोहोचतील या हिशोबाने अगोदर अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
  • सदरील SSC Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याचा फॉर्म जाहिरातीच्या शेवट देण्यात आलेला आहे. हा अर्ज भरायची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

     

  • या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यामध्ये स्वतःचा फोटो पासपोर्ट साईज मधील चिकटवायचा आहे. पहिल्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण नाव आणि पत्ता इंग्रजी कॅपिटल लेटर मध्ये लिहायचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज करायचे आहे त्या पदाचे नाव लिहायचे आहे. 2.1 या ठिकाणी उमेदवारांनी रिजनल ऑफिस संदर्भात माहिती लिहायची आहे. तिसऱ्या क्रमांकावर उमेदवारांनी जन्मतारीख लिहायची आहे. चौथ्या क्रमांकावर उमेदवारांनी सेवानिवृत्तीची तारीख लिहायची आहे. पाचव्या या क्रमांकावर उमेदवारांनी सध्या ज्या ठिकाणी काम करत आहे त्या संस्थेबद्दल माहिती लिहायची आहे. सहाव्या क्रमांकावर कामावर नियुक्त झालेल्या तारीख लिहायची आहे. सातव्या क्रमांकावर उमेदवारांनी ऑफिस चा पत्ता त्यासोबत टेलीफोन नंबर आणि ईमेल आयडी लिहायचा आहे. आठव्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःचा रेसिडेन्शियल ऍड्रेस सोबत टेलीफोन नंबर लिहायचा आहे. नवव्या क्रमांकावर उमेदवारांनी सध्या कोणत्या पदावर काम करत आहे त्या पदा संदर्भात माहिती त्याचबरोबर पगार लिहायचा आहे.

     

  • 10 व्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण कॉलिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता लिहायचे आहे.

     

  • दहाव्या क्रमांकावर उमेदवारांनी पात्र असलेली शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर ज्या पात्रते ला प्राधान्य देण्यात आलेले आहे अशा शैक्षणिक पात्रता संदर्भात आणि अनुभव प्रमाणपत्र उमेदवारांनी लिहायचे आहे.

     

  • 12 व्या क्रमांकावर उमेदवारांनी आता ज्या ऑफिस मध्ये काम करत आहे त्या ऑफिसचे नाव कोणत्या पदावर काम केलेले आहे त्या पदाचे नाव त्याचबरोबर किती तारखेपासून किती तारखेपर्यंत काम केलेले आहे त्याचे कालावधी किती पगारावर काम केलेले आहे तो पगार.

     

  • तेराव्या क्रमांकावर उमेदवारांनी सध्या करत असलेल्या कामाचे स्वरूप लिहायचे आहे.
  • कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ” अवर सचिव (स्थापना), ब्लॉक क्रमांक 12, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.

SSC Bharti 2024 | कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • कर्मचारी निवड आयोग येथील SSC Bharti 2024 भरती करिता उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज पाठवायचे आहेत. उमेदवारांनी पत्राद्वारे, कुरियर द्वारे, स्पीड पोस्ट द्वारे तेव्हा समक्ष उपस्थित राहून अर्ज पाठवायचे आहेत.

     

  • कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीद्वारे अर्ज करायचे नाहीत. त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले नाहीत. उमेदवारांनी कोणत्याही लिंक द्वारे किंवा वेबसाईट द्वारे अर्ज करू नयेत.

     

  • कर्मचारी निवड आयोग येथील SSC Bharti 2024 भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी दिलेल्या नमुन्याचा अर्ज करायचे आहेत. अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड करू नये. कोणत्याही उमेदवारांनी अपूर्ण अर्ज भरू नयत. अपूर्णांक भरणाऱ्या उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.

     

  • 10 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. कारण ही तारीख खर्च करण्याची अंतिम दिनांक आहे.

     

  • या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात समजून घेण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करावी.

SSC Bharti 2024 | कर्मचारी निवड आयोग येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • सदरील भरती करिता अर्ज करणारे उमेदवार पुढील भरतीच्या प्रक्रिय करिता पात्र असणार आहेत. ऑफलाइन पद्धतीने मिळालेले अर्ज ची दखल घेतली जाणार आहे.

     

  • या भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कर्मचारी निवड आयोग यांच्याकडून कसल्याही स्वरूपाचा TA / DA देण्यात येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे.

     

  • सदरील SSC Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कर्मचारी निवड आयोग यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

     

  • कर्मचारी निवड आयोग यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे.
  • कर्मचारी निवड आयोग येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment