Shivamrut Milk Solapur Bharti 2024 | शिवामृत दूध उत्पादन सहकारी संघ येथे 25 जागांसाठी नोकरीची संधी.

Shivamrut Milk Solapur Bharti 2024   नमस्कार मित्रांनो आज आपण शिवामृत दूध उत्पादन सहकारी संघ मर्यादित सोलापूर अंतर्गत निघालेल्या 25 जागांच्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. शिवामृत दूध येथील भरती मधून 25 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज पाठवायचा आहे. “ईटीपी इन्चार्ज, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, फिटर, प्रोसेस प्लांट ऑपरेटर, सिक्युरिटी गार्ड” या पदांकरिता सदरील भरती मधून शिवामृत दूध येथे काम करण्याकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 17 ऑक्टोबर 2024 ही या भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती करिता अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी शिवामृत दूध उत्पादन सहकारी संघ मर्यादित सोलापूर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती करिता खालील लेख पहा.

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथे भरती.

  • शिवामृत दूध उत्पादन सहकारी संघ यांच्याद्वारे होणाऱ्या भरती मधून 25 जागा भरल्या जाणार आहेत.
  • शिवामृत दूध उत्पादन सहकारी संघ यांच्याद्वारे टीपी इन्चार्ज, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, फिटर, प्रोसेस प्लांट ऑपरेटर, सिक्युरिटी गार्ड या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

Shivamrut Milk Solapur Bharti 2024 | शिवामृत दूध उत्पादन सहकारी संघ येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • ई.टी.पी इन्चार्ज या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून एम.एससी ( एन्व्हायरमेंटल ) ही पदवी उत्तीर्ण केली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सांडपाणी प्रक्रिया / पर्यावरण व्यवस्थापन / ईटीपी ऑपरेशन्स संबंधित कामकाजाचे किमान दोन ते पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे पर्यावरण नियमांचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
  • मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अर्ज करणार उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर / बीबीए / एमबीए / डीबीएम / डिप्लोमा ( मार्केटिंग & सेल्स ) यापैकी कोणतीही पदवी असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे तीन वर्षाचा डेअरी / फास्ट मुविंग कंज्यूमर गुड्स क्षेत्रातील मार्केटिंगचा तीन वर्षाचा अनुभव असावा. उमेदवाराकडे मार्केट सर्वे करणे, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया आणि विपणन योजना विकसित व अंमलबजावणी करण्यासंदर्भात ज्ञान, संभाषण कौशल्य या प्रकारचे सर्व कौशल्य असणे गरजेचे आहे.
Shivamrut Milk Solapur Bharti 2024 
Shivamrut Milk Solapur Bharti 2024
  • फिटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय ( फिटर ) / डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे डेरी प्लांट मधील मशिनरीची आणि उपकरणांची देखभाल , दुरुस्ती व इन्स्टॉल करण्याचा किमान एक ते दोन वर्षाचा अनुभव असावा.
  • प्रोसेस प्लांट ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिशियन ) / फिटर / 10वी / 12 वी पास यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • सिक्युरिटी गार्ड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कमीत कमी 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांकडे एनसीसी प्रमाणपत्र आहे आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. यापूर्वी उमेदवारांनी नामांकित संस्थेमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केलेला दोन वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे फायर फायटिंग चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • सदरील Shivamrut Milk Solapur Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण सोलापूर असणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.
  • Shivamrut Milk Solapur Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होण्याकरिता उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.
  • shivamrutakluj@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • ईटीपी इन्चार्ज या पदाकरिता 01 जागा रिक्त आहे.
  • मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदाकरिता एकूण 10 जागा रिक्त आहेत.
  • फिटर या पदाकरिता 02 जागा रिक्त आहेत.
  • प्रोसेस प्लांट ऑपरेटर या पदासाठी 02 जागा रिक्त आहेत.
  • सिक्युरिटी गार्ड पदाकरिता 10 जागा रिक्त आहेत.

Shivamrut Milk Solapur Bharti 2024 | शिवामृत  दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादित सोलापूर संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • शिवामृत मिल्क दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादित सोलापूर या संघाची स्थापना 27 जानेवारी 1976 रोजी झालेली आहे. या दूध संघाची सुरुवात सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये झालेली होती. त्यामध्ये माळशिरस, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा आणि करमाळा या तालुक्यांचा समावेश होता. सध्या या दूध संघात माळशिरस तालुका आणि तालुक्यातील 237 गावांमधील दूध उत्पादक आहेत. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाने या दूध संघाची प्रगती जोराने होता आहे. संघाच्या कार्यक्षेत्र मध्ये एकूण 250 कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये 40,000 लोकांना याचा फायदा होत आहे.
  • शिवामृत मिल्क दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादित सोलापूर यांची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत.
  1. दूध उत्पादकांकडून दूध संघा पर्यंत पोहोचण्याकरता दूध खरेदीचे उपक्रम राबवणे.
  2. दुधावर प्रक्रिया करताना अत्यंत स्वच्छ वातावरणात होमजेनायजेशन आणि पाश्चरायझेशन द्वारे प्रक्रिया करणे.
  3. दूध आणि दुधावर प्रक्रिया करून बनवलेले पदार्थ यांच्याकरिता बाजारपेठा शोधणे.
  4. आर्थिक भांडवल सुरक्षित ठेवण्याकरिता प्रयत्न करणे.
  5. दूध संघाच्या कार्यक्षेत्र मधील दूध उत्पादक जनावरा करिता औषध आणि जैविक सामग्री उपलब्ध करून देणे.
  6. पशुखाद्याचे पौष्टिक आणि संतुलित उत्पादन करून पुरवठा करणे.
  7. दुभत्या गुरांचा विमा काढणे.
  • शिवामृत दूध संघाकडून दही, श्रीखंड, मलई पनीर, लस्सी, पेढा, खवा, बटर, तूप यांसारखे उत्पादन घेतले जाते.
  • शिवामृत दूध संघाची स्थापना श्री शंकरराव मोहिते पाटील यांनी केलेली होती.

Shivamrut Milk Solapur Bharti 2024 | शिवामृत दूध सहकारी संघ येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • शिवामृत दूध सहकारी संघ येथील Shivamrut Milk Solapur Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांना फक्त ई-मेल द्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.
  • शिवामृत दूध सहकारी संघ येथील भरतीसाठी कोणताही उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकत नाही.
  • उमेदवारांनी ई-मेल द्वारे माहिती सादर करत असताना संपूर्ण माहिती योग्य सादर करायचे आहे. कोणतीही माहिती उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने सादर केल्यास उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
  • 17 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
  • ई-मेल द्वारे अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे.

Shivamrut Milk Solapur Bharti 2024 | शिवामृत दूध सहकारी संघ येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • सदरील Shivamrut Milk Solapur Bharti 2024 भरती करिता ज्या उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच पदावर निवडण्यात येतील.
  • सदरील भरती करिता प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्याकरिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संघाकडून TA / DA देण्यात येणार नाही.
  • शिवामृत दूध संघ येथील भरतीमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर संघाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • शिवामृत दूध संघ येथील भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पात्रतेची पूर्तता केलेली असेल तरच अर्ज करावा.
  • शिवामृत दूध संघ येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • शिवामृत दूध संघ येथील भरती साठी वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरातीची पीडीएफ वाचावी.
  • पदावर नियुक्त होण्यासाठी उमेदवाराला ज्या अनुभवाची आवश्यकता आहे. त्या अनुभवाची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.
  • शिवामृत दूध संघ यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • शिवामृत दूध संघ यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment