Punjab and Sindh Bank Bharti 2024 | पंजाब आणि सिंध बँक येथे 100 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Punjab and Sindh Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण पंजाब आणि सिंध बँक यांच्याद्वारे करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक पाहणार आहोत. पंजाब आणि सिंध बँक द्वारे 100 नवीन जागांसाठी उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता देण्यात येणारी अंतिम दिनांक आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ” अप्रेंटिस ” या पदाकरिता पंजाब आणि सिंध बँक यांच्याद्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पंजाब आणि सिंध बँक भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा. अधिक माहिती करिता खालील लेख काळजीपूर्वक वाचावा.

  • 100 रिक्त जागांकरिता पंजाब आणि सिंध बँक येथील भरतीसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
  • निवडले जाणारे 100 उमेदवार हे ‘ अप्रेंटिस ‘ पदाकरिता निवडले जाणार आहेत.

शिवामृत दूध संघ येथे भरती.

Punjab and Sindh Bank Bharti 2024 | पंजाब आणि सिंध बँक येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • सदरील Punjab and Sindh Bank Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त असलेल्या विद्यापीठातून नियमित पूर्णवेळ अभ्यासक्रमातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लोकल भाषेमध्ये लिहिता, वाचता आणि बोलता आले पाहिजे. अर्ज केलेल्या उमेदवाराला आठवी, नववी, 10वी, 12 वी आणि पदवी उत्तीर्ण झालेले चे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या ज्या उमेदवारांचे शिक्षण पदव्युत्तर पदवी झालेले आहे. आशा उमेदवारांना सदरील प्रशिक्षणासाठी अर्ज करता येणार नाहीत.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे जर कामाचा एक वर्षापेक्षा अधिक चा अनुभव असेल. किंवा एक वर्षाचा अनुभव असेल तर असा उमेदवार प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करू शकत नाही.
  • पदवी उत्तीर्ण केल्यानंतर ज्या उमेदवारांना पाच वर्षे झालेले आहेत असे उमेदवार सदरील प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकत नाहीत.
  • सदरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 20 वर्ष असावे आणि जास्तीत जास्त 28 वर्षे असावे. SC / ST / OBC / PwBD या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • रोपार या ठिकाणी दोन जागा रिक्त आहेत.
  • फत्तेगड या ठिकाणी एकूण दोन जागा रिक्त आहेत.
  • कपूरतळा या ठिकाणी एकूण दोन जागा रिक्त आहेत.
  • सारंगपूर या ठिकाणी एकूण दोन जागा रिक्त आहेत.
  • दिल्ली या ठिकाणी एकूण 30 जागा रिक्त आहे.
  • SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येईल.
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्ष सूट देण्यात येईल.
  • अपंग उमेदवारांना सदरील भरती मध्ये वयामध्ये 10 वर्ष सूट देण्यात आलेली आहे.
  • विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी वय मर्यादा 35 वर्षापर्यंत राहील.SC / ST / OBC महिलांकरिता वय मर्यादा 40 वर्षे राहील.
  • सदरील भरती मधील प्रशिक्षणाचा कालावधी 12 महिन्याचा राहील. या कालावधीमध्ये उमेदवाराला दरमहा 9000 रुपये मानधन देण्यात येईल.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दैनंदिन खर्च / प्रवासी खर्च / निवासी खर्च बँकेकडून उमेदवारांना देण्यात येणार नाही.
  • बँकेच्या नियमानुसार असणाऱ्या सुट्ट्या उमेदवाराला मिळतील.
  • पंजाब आणि सिंध बँक येथील Punjab and Sindh Bank Bharti 2024 भरतीसाठी जाहीर करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • पंजाब आणि सिंध बँक येथील Punjab and Sindh Bank Bharti 2024 भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Punjab and Sindh Bank Bharti 2024 | पंजाब आणि सिंध बँक येथील भरतीसाठी निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सदरील Punjab and Sindh Bank Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांमधून उमेदवारांच्या 12 वीच्या मार्क्सच्या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने निवडलेल्या राज्य आणि जिल्ह्यानुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांची राज्यानुसार आणि प्रवर्गानुसार गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
  • जर कोणत्याही दोन उमेदवारांना समान गुण मिळालेले असतील. तर अशा उमेदवारांमधून योग्य उमेदवार निवडताना ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे आशा उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
  • राज्य, जिल्हा आणि जातीय प्रवर्ग यानुसार योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.

Punjab and Sindh Bank Bharti 2024 | पंजाब आणि सिंध बँक भरती साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • पंजाब आणि सिंध बँक येथील भरती करिता अर्ज करण्याची ऑनलाईन वेबसाईट देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी त्या वेबसाईट द्वारे अर्ज करायचा आहे.
  • पंजाब आणि सिंध बँक यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा पत्ता देण्यात आलेला नाही त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
  • पंजाब आणि सिंध बँक येथील Punjab and Sindh Bank Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती, अर्जामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक योग्य लिहायचे आहे. जर कोणत्याही उमेदवारांनी चुकीची माहिती लिहिली तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा उमेदवाराचा अर्ज सुद्धा बाद करण्यात येईल.
  • 31 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे.
  • सदरील भरती ची जाहिरात पंजाब आणि बँक यांच्याकडून देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी ही जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.

Punjab and Sindh Bank Bharti 2024 | सदरील भरती ची जाहिरात पंजाब आणि बँक येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • पंजाब आणि सिंध बँक येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. आशा उमेदवारांनाच पदावर नियुक्त करण्यात येणार आहे. इतर कोणत्याही उमेदवारांना संधी देण्यात येणार नाही.
  • पंजाब आणि सिंध बँक यांच्या Punjab and Sindh Bank Bharti 2024 भरती मध्ये सहभाग घेणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला बँक कडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
  • प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये वेबसाईट देण्यात आलेली आहे. त्या वेबसाईट द्वारे इच्छुक उमेदवारांनी भरती करिता अर्ज करायचा आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना पंजाब आणि सिंध बँक यांच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. काम करत असताना उमेदवाराने शिस्त राखणे गरजेचे आहे.
  • या भरती करिता रिक्त असलेल्या पदांकरिता किती जागा शिल्लक आहेत याबाबतचा तपशील जाहिराती मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. त्यानुसारच उमेदवाराने संबंधित पदासाठी अर्ज करावा.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या SC / ST / PWBD या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क ₹ 100 असणार आहे.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना सदरील भरतीसाठी परीक्षा शुल्क 200 रुपये असणार आहे.

Punjab and Sindh Bank Bharti 2024 | पंजाब आणि सिंध बँक येथील भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.

  • 16 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून सदरील भरती करिता उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
  • 31 ऑक्टोबर 2024 या तारखेला नवीन रजिस्ट्रेशन करणे बंद होणार आहे.
  • 15 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवार भरलेल्या अर्जाची प्रिंट काढू शकतात.
  • 16 ऑक्टोबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने शुल्क जमा करायचे आहेत.
  • पंजाब आणि सिंध बँक येथील Punjab and Sindh Bank Bharti 2024 भरतीसाठी वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पंजाब आणि सिंध बँक संदर्भात अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे.

Leave a Comment