NHB Bharti 2024 | नॅशनल हाऊसिंग बँक येथे 19 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

NHB Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण नॅशनल हाऊसिंग बँक येथे होणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 19 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मधून मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 1 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नॅशनल हाऊसिंग बँक येथील होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहितीसाठी खालील देण्यात आलेला लेख वाचावा.

  • 19 रिक्त जागा भरण्याकरिता नॅशनल हाऊसिंग बँक यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • नॅशनल हाऊसिंग बँक येथील भरती मधून मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

युनियन कमर्शियल बँक येथे भरती.

NHB Bharti 2024
NHB Bharti 2024

Table of Contents

NHB Bharti 2024 | नॅशनल हाऊसिंग बँक येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे.

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB) यांच्याकडून मॅनेजर (MMG स्केल-III) आणि डिप्टी मॅनेजर (MMG स्केल-II) पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सदरील भरती ही एक सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक ने मॅनेजर आणि डिप्टी मॅनेजर पदांसाठी अर्ज मागविले आहेत. जर तुम्हाला बँकिंग फील्डमध्ये जॉब करायची इच्छा असेल आणि तुम्ही पात्रता मध्ये बसत असाल तर ही माहिती पूर्ण वाचा आणि अर्ज करण्याआधी सर्व माहिती समजून घ्या.

NHB Bharti 2024 | आवश्यक पात्रता : उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती

1. आवश्यक पात्रता चेक करा

  • अर्ज भरण्याआधी पात्रता तपासा:
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी या जाहिरातीत दिलेले सर्व निकष समजून त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयाच्या अटी संदर्भातील पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे.
  • शुल्क भरण्यासाठी पेमेंट करण्याची पद्धत.
  • उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेव्हा फक्त अर्जाची फी / सूचना शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे.
  • शुल्क भरण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पेमेंट पद्धतीचा वापर करावा.
  • प्रोव्हिजनल प्रवेश :
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रोव्हिजनल कॉल लेटर देण्यात येणार आहे.
  • मुलाखती दरम्यान उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी करण्यात येईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पात्रतेची पूर्तता केलेली नसेल तर अर्ज रद्द करण्यात येईल.

NHB Bharti 2024 | अर्ज करण्याची पद्धत : फक्त Online अर्ज करा

  • अर्ज करण्याची तारीख: भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 12 ऑक्टोबर 2024 ते 1 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत भरायचे आहेत.
  • अर्ज सादर करण्यासाठी वेबसाइट: www.nhb.org.in
  • Call Letter: निवड झालेल्या उमेदवारांचे Call Letter डाऊनलोड करण्याची माहिती NHB च्या वेबसाइटवर देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रम तारीख/महिना
कट ऑफ जाहीर करणे 1 ऑक्टोबर 2024
ऑनलाइन नोंदणी करणे आणि फी भरणे 12 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2024
मुलाखत तारीख नंतर कळवली जाईल

 नवीन भरती संदर्भातील जागा :

Post SC ST OBC-NCL EWS UR Total
मॅनेजर (Scale III) 02 03 01 04 10
डिप्टी मॅनेजर (Scale II) 01 01 02 01 04 09

Grand Total: 19 पदे

NHB Bharti 2024 | आवश्यक पात्रता

 नागरिकत्व :

वरील भरतीसाठी कर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा किंवा खालील गटांपैकी एकाचा भाग असणे गरजेचे आहे.

  1. नेपाळ/ भूतानचे नागरिक असणे गरजेचे आहे.
  2. 1 जानेवारी 1962 पूर्वी भारतात स्थायिक झालेले तिबेटी निर्वासित असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

 वय मर्यादा :

  • मॅनेजर (Scale III): पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ते 35 वर्षे पर्यंत असावे.
  • डिप्टी मॅनेजर (Scale II): पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ते 32 वर्षे पर्यंत असावे.
वयामध्ये सूट खालील प्रमाणे आहे.
  • SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येणार आहे.
  • OBC (Non-Creamy Layer) प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात येणार आहे.
  • PwBD (General) प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 10 वर्ष सूट देण्यात येणार आहे, अपंग प्रवर्गातील (SC/ST) उमेदवारांना वयामध्ये 15 वर्ष सूट मिळेल. अपंग प्रवर्गातील (OBC) उमेदवारांना वयामध्ये 13 वर्षे सूट मिळेल.
  • Ex-Servicemen प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट मिळणार आहे.

NHB Bharti 2024 |  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मॅनेजर (Credit/Audit/Inspection/Compliance):

  • शैक्षणिक पात्रता:
  • रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली असावी + ICWAI/ICAI/CFA/MBA यापैकी कोणतीही पदव्युत्तर पदवी मिळवलेली असावी.
  • अनुभव :
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कामाचा चार वर्षाचा अनुभव असावा, त्यापैकी 2 वर्षे Compliance, Audit, Inspection किंवा Credit-Retail Lending मध्ये काम केलेला अनुभव असावा.

मॅनेजर (Data Scientist):

  • शैक्षणिक पात्रता :
  • या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर पदवी Statistics/Data Science किंवा Artificial Intelligence/Machine Learning या शाखांमधून उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुभव :
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 4 वर्षे डाटा सायंटिस्ट किंवा डाटा एन्ट्री एक्स म्हणून काम केलेला अनुभव असावा.

डिप्टी मॅनेजर (Credit/Audit/Inspection/Compliance):

  • शैक्षणिक पात्रता
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी. + ICWAI/ICAI/CFA/MBA
  • अनुभव :
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 2 वर्षांचा अनुभव विशेषतः Compliance, Audit, किंवा Credit-Retail Lending मधील असावा.

डिप्टी मॅनेजर (Data Scientist):

  • शैक्षणिक पात्रता :
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर पदवी Statistics/Data Science किंवा Artificial Intelligence/Machine Learning मधून उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुभव :
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 2 वर्षांचा Data Analysis किंवा Machine Learning मध्ये काम केलेला अनुभव असावा.

NHB Bharti 2024 |  कामाचे स्वरूप आणि कौशल्य

मॅनेजर (Credit/Audit/Inspection/Compliance):

  • क्रेडिट मूल्यांकन
  • अंतर्गत ऑडिट
  • तपासणी अहवाल तयार करणे
  • धोरणे आणि SOP तयार करणे

मॅनेजर (Data Scientist):

  • डेटा विश्लेषण
  • भविष्य सूचक आंतर दृष्टी मिळवणे
  • मशीन लर्निंग / आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून डेटा मॉडेल तयार करणे

डिप्टी मॅनेजर (Credit/Audit/Inspection/Compliance):

  • ऑडिट आणि अनुपालन अहवाल तयार करणे
  • क्रेडिट मॉनिटरिंग आणि वैधता
  • SOP तयार करणे

डिप्टी मॅनेजर (Data Scientist):

  • डेटा रिपोर्ट निरीक्षण करणे
  • डेटा मॉडेल तयार करणे आणि Insights काढणे

कसे अर्ज कराल?

  1. वेबसाइटवर जा: www.nhb.org.in
  2. नोंदणी करा: अर्ज भरून फी जमा करा.
  3. कागदपत्र अपलोड करा: स्कॅन केलेले फोटोग्राफ, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. शुल्क भरण्याची पद्धत : फक्त ऑनलाइन पद्धतीने

महत्त्वाची सूचना:

  • भरतीसाठी आवश्यक पात्रता पूर्ण केल्याशिवाय अर्ज करू नका.
  • कॉल लेटर मिळाल्यानंतर वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहा.
  • ओरिजनल कागदपत्रे मुलाखती दरम्यान सादर करा.

NHB Bharti 2024 | नॅशनल हाऊसिंग बँक येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.

  • नॅशनल हाऊसिंग बँक येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन वेबसाईट द्वारे अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची वेबसाईट उमेदवारांना जाहिरातीमध्ये मिळून जाईल. त्याद्वारे उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
  • नॅशनल हाऊसिंग बँक लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे नाहीत. बँकेच्या पत्त्यावर कोणत्याही उमेदवारांनी आपल्या अर्ज पाठवायचे नाहीत.
  • नॅशनल हाऊसिंग बँक येथील भरती करिता आवश्यक माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरात संपूर्ण वाचल्यानंतर उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे. त्यापूर्वी कोणत्याही उमेदवारांनी अर्ज करायचा नाही.
  • ऑनलाइन अर्ज भरत असताना कोणत्याही उमेदवारांनी चुकीची माहिती द्यायची नाही. चुकीची माहिती देणाऱ्या उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.

Leave a Comment