MTDC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरातीची माहिती पाहणार आहोत. सदरच्या होणाऱ्या भरती मधून ” पर्यटक ” या पदासाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. सदरील भरती मधून नियोजित असलेल्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यावरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे किंवा ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज पाठवायचे आहेत. 15 नोव्हेंबर 2024 भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती करिता खालील देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.
- नियोजित रिक्त जागा भरण्याकरिता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याद्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- ‘ पर्यटक’ या पदाकरिता योग्य उमेदवार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून निवडले जाणार आहेत.
ZVM युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल , पुणे भरती
MTDC Bharti 2024 | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा पुढील प्रमाणे आहे.
- सदरील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून आठवी किंवा 10वी किंवा 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- उमेदवाराला मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी किंवा इतर कोणतीही परदेशी भाषा स्पष्ट लिहिता आणि बोलता येणे गरजेचे आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार ठराविक पर्यटन स्थळाच्या नजीकचा रहिवासी असावा.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षापर्यंत असावेत.
- सदरील भरतीच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांना ‘ पर्यटक गाईड ‘ ही पदवी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ‘ पर्यटन गाईडला’ आयकार्ड महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून दिले जाणार आहे.
- सदरील MTDC Bharti 2024 भरती मधून योग्य उमेदवार निवडल्यानंतर त्या उमेदवारांकरिता पर्यटनाचे ठिकाण आणि कालावधी उमेदवाराला कळवण्यात येईल.
- सदरील MTDC Bharti 2024 भरतीचा अभ्यासक्रम पूर्ण केला म्हणून कोणत्याही उमेदवाराला कायमस्वरूपी च्या नोकरीचे हमी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून देण्यात येणार नाही.
- पदावर नियुक्त झालेल्या पर्यटन गाईडला कामाच्या स्वरूपानुसार जास्त वेळ काम करावे लागणार आहे त्याचप्रमाणे त्याला इतर ठिकाणी प्रवास सुद्धा करावा लागणार आहे.
- उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, पद, वय, ओळखपत्र यासंदर्भातील कागदपत्रे उमेदवारांना मुलाखतीच्या वेळेस पडताळणी करिता जमा करावी लागणार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र जमा करावी लागणार आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून निवड झालेल्या उमेदवारांना पोलीस वेरिफिकेशन ला सामोरे जावे लागणार आहे.
- पदावर नियुक्त होण्यापूर्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी येण्याकरिता कोणत्याही प्रकारचा प्रवासी खर्च देण्यात येणार नाही.
- पदावर नियुक्त झालेल्या कोणत्याही उमेदवाराला कसल्याही स्वरूपाचे मानधन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याद्वारे देण्यात येणार नाही.
- सदरील निघालेली भरती ही उमेदवारांचे पर्यटन क्षेत्रातले कौशल्य वाढवण्याकरिता निघालेली आहे. याद्वारे कोणत्याही नोकरीची हमी उमेदवारांना देण्यात येणार नाही.
- या भरतीमध्ये प्रवेश करण्याकरिता सर्व उमेदवारांनी स्वखर्चाने भरतीमध्ये सहभागी व्हायचे आहे.
- सदरील MTDC Bharti 2024 भरती करिता अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षामध्ये सहभागी नसलेला असावा.
- 12 ऑक्टोबर 2024 पासून 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
- उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्याची दिनांक, मुलाखतीचे दिनांक, वेटिंग लिस्ट मधील उमेदवारांची यादी जाहीर करण्याची दिनांक, ऑफर लेटर स्वीकारणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करू शकतात. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी resortguide@maharashtratourism.gov.in या ईमेल आयडी वरती आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- सदरील MTDC Bharti 2024 भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. ” महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मफतलाल हाऊस, पहिला मजला, एसटी पारिख मार्ग, 169 बँक बे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई 40020 ” या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
MTDC Bharti 2024 | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन ईमेल द्वारे किंवा ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकतात.
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाची वेबसाईट अर्ज करण्याकरिता किंवा ऑनलाइन प्रणाली अर्ज करण्याकरिता देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही फसव्या ऑनलाइन लिंक द्वारे अर्ज करू नये.
- ऑफलाइन पद्धतीने सदरील भरती करिता किंवा ई-मेल द्वारे अर्ज करत असताना इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नये. त्याचप्रमाणे अर्ज भरताना खडाखोड करू नये. अपूर्ण अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचा अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. असे अर्ज रद्द करण्यात येतील.
- 15 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर ऑनलाईन ई-मेल द्वारे किंवा ऑफलाईन पत्राद्वारे मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथील भरती करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून समजून घ्यायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
MTDC Bharti 2024 | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथील भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच भरतीच्या प्रक्रिये करीता पात्र असतील. इतर कोणत्याही उमेदवाराला प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येणार नाही.
- सदरच्या MTDC Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यावी.
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला तर अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल आणि त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
MTDC Bharti 2024 | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.
- महाराष्ट्र राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी आणि पर्यटनाच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याची स्थापना करण्यात आलेली आहे. या संस्थेद्वारे महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाच्या ठिकाणचे रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट मॅनेज केले जातात. हेरिटेज स्पोर्ट, एडवेंचर ऍक्टिव्हिटी, एक्वेटिक स्पोर्ट यांसारख्या सेवा पर्यटना सोबत पर्यटकांना महामंडळाकडून देण्यात येतात. पर्यटन ठिकाणच्या नजीकच्या क्षेत्रातील विविध जेवणाच्या पद्धती आणि खाद्यपदार्थ पर्यटकांना देण्यासाठी प्रोत्साहन केले जाते. महामंडळाचे रेस्टॉरंट खूप चांगल्या पर्यटन ठिकाणी जवळ असतात.
- सदरील महामंडळाद्वारे महाराष्ट्रातील एकूण 29 रिसॉर्ट चालवले जातात. त्याचप्रमाणे 27 रेस्टॉरंट चालवण्यात येतात. तीन एक्वेटिक स्पोर्ट्स सेंटर यांच्याद्वारे चालवण्यात येतात. महाराष्ट्रातील नाशिक, रत्नागिरी, पुणे, औरंगाबाद, नागपूर या रीजन मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रेस्टॉरंट आहेत.
- दिवेआगर, तारकर्ली, श्रीवर्धन, वेलनेश्वर, बोर्डी डहाणू, गणपतीपुळे, हरणाई- मुरुड, तारकर्ली 1, गुहागर, शिरोडा बीच, अलिबाग, वेंगुर्ला, हरिहरेश्वर, वेलास समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन बीच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे चालवण्यात येतात.
- पर्यटन विकास महामंडळ येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती समजून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.