KRCL Bharti 2024 | कोकण रेल्वे येथे 413 रिक्त जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

KRCL Bharti 2024  रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. कारण कोकण रेल्वे येथे 413 रिक्त जागांसाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांनी कोकण रेल्वेद्वारे देण्यात आलेल्या ऑनलाइन वेबसाईट द्वारे अर्ज करायचा आहे. कोकण रेल्वे करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 ही आहे. कोकण रेल्वे येथे अप्रेंटिस पदाकरिता उमेदवारांची नेमणूक करायची आहे. कोकण रेल्वे येथील भरतीसाठी खाली महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. ही माहिती अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक झाली.

  • 413 रिक्त जागा कोकण रेल्वे भरती मधून भरण्यात येणार आहे.
  • कोकण रेल्वे भरती मधून अप्रेंटिस पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

[ KRCL Bharti 2024 ] कोकण रेल्वे येथील भरती करिता पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E / B.Tech पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे.
  • KRCL Bharti 2024  सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक या शाखेत मधून अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका मिळवलेले उमेदवार सदरील भरतीसाठी पात्र असणार आहेत.
  • KRCL Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदवी किंवा पदविका 2020, 2021, 2022, 2023 , 2024 यापैकी कोणत्याही वर्षी उत्तीर्ण केलेली असावी.
  • अप्रेंटिस प्रशिक्षण कायदा 1961 / 1973 या नियमानुसार अप्रेंटिस उमेदवाराला प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • उमेदवाराला देण्यात येणारे सदरील प्रशिक्षण कोकण रेल्वेच्या मार्गावरील विविध ठिकाणी असेल. त्यामध्ये महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांचा समावेश आहे.
  • सिविल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांसाठी 30 रिक्त जागा आहेत.
  • इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारासाठी 20 रिक्त जागा असणार आहेत.
  • इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारासाठी 10 रिक्त जागा असणार आहेत.
  • मेकॅनिकल इंजीनियरिंग पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारासाठी 20 रिक्त जागा असणार आहेत.
  • सिविल इंजीनियरिंग शाखेची पदवीका उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांसाठी 30 जागा आहेत.
  • इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग शाखेची पदवीका उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांसाठी 20 जागा आहेत.
  • इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग शाखेची पदवीका उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांसाठी 10 जागा आहेत.
  • मेकॅनिकल इंजीनियरिंग शाखेची पदवीका उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांसाठी 20 जागा आहेत.
  • कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांकरिता 30 जागा रिक्त आहेत.
  • KRCL Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम पोर्टल वरती रजिस्ट्रेशन केलेले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे वैध NATS ID असणे गरजेचे आहे. जर नसेल तर डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या दरम्यान उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • मागील पाच वर्षांमध्ये पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे –
  1. सिविल इंजीनियरिंग – या शाखेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून सिविल इंजिनिअरिंग शाखेची BE / B.Tech पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  2. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग – या शाखेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि पावर इंजीनियरिंग किंवा इलेक्ट्रिकल शाखेच्या इतर उपशाखा मधून BE / B.Tech पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  3. इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग – या शाखेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कम्युनिकेशन इंजिनिअरिंग / कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग / कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर इंजिनीअरिंग यापैकी कोणत्याही एका शाखेची BE / B.Tech पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  4. मेकॅनिकल इंजिनिअरिंग – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून मेकॅनिकल / इंडस्ट्रियल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन या शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली पाहिजे.
  1. सिव्हिल इंजिनिअरिंग – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेची पदविका मान्यताप्राप्त संस्थेमधून मिळवलेली असणे आवश्यक आहे.
  2. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग – सदरील शाखेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स & पावर इंजीनियरिंग या शाखेतून पदविका उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  3. इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग – या शाखेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कम्युनिकेशन इंजीनियरिंग / कम्प्युटर सायन्स & इंजीनियरिंग या शाखांमधून पदविका उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  4. मेकॅनिकल इंजिनिअरिंग – या शाखेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून मेकॅनिकल / इंडस्ट्रियल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन या शाखेमधून पदविका उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • पदवीधर अप्रेंटिस ( जनरल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बॅचलर ऑफ आर्ट / बॅचलर ऑफ सायन्स / बॅचलर ऑफ कॉमर्स / बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन / बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स / बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन / बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • ज्या उमेदवारांची जन्मतारीख 1 सप्टेंबर 1999 ते 1 सप्टेंबर 2006 दरम्यान आहे असे लोक सदरील भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षापर्यंत पाहिजे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात आलेली आहे. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • KRCL Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. अप्रेंटिस कायदा 1961 नुसार उमेदवाराकडे शारीरिक दृष्ट्या सक्षम असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र गव्हर्मेंट डॉक्टरांकडून प्रमाणित केलेल्या असावे. डॉक्टरांचा दर्जा असिस्टंट सर्जन पेक्षा कमी नसावा.
  • सदरील भरतीसाठी KRCL Bharti 2024  अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही अप्रेंटिस प्रशिक्षणामध्ये सध्या रुजू झाला असेल तर त्या उमेदवाराला सदरील अप्रेंटिस शिप प्रशिक्षणामध्ये सहभागी होता येणार नाही.
  • पदवीधर अप्रेंटिस KRCL Bharti 2024  या पदासाठी उमेदवारांना दरमहा 4500 रुपये मानधन मिळणार आहे. तर पदविका अप्रेंटिस यांना दरमहा 4000 रुपये मानधन मिळणार आहे.
  • प्रशिक्षणाचा कालावधी मध्ये उमेदवारांनी स्वतःची राहण्याची सोय स्वतः करावी.
  • सदरील प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे स्वतःचे बँक खाते त्याचप्रमाणे स्वतःच्या नावाचे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.

[ KRCL Bharti 2024 ] कोकण रेल्वे भरती येथील निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सदरील KRCL Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या सर्व सेमिस्टर चे मार्क त्यांची बेरीज केली जाईल. आणि त्याचे ॲग्री गेट पर्सेंटेज काढले जाईल. आणि त्यावरून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. टक्केवारी मध्ये कोणत्याही प्रकारचा राउंड ऑफ करण्यात येणार नाही. सर्व सेमिस्टरला समान महत्त्व देण्यात येईल.
  • सदरील KRCL Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये दोन उमेदवारांना समान गुण असतील तर त्यातील जास्त वयाच्या उमेदवाराची निवड करण्यात येईल. जर दोन्ही उमेदवारांची जन्मतारीख सुद्धा समान असेल प्रजा उमेदवाराने 10 वी परीक्षा पहिल्यांदा पास केलेली आहे आशा उमेदवाराची निवड करण्यात येईल.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी 1/3 उमेदवारांना पहिल्या राउंड मध्ये डॉक्युमेंट वेरिफिकेशन करण्याकरिता बोलावण्यात येईल. त्यानंतर इतर उमेदवारांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलवण्यात येणार आहे.
  • ज्या उमेदवारांची जमीन कोकण रेल्वेच्या प्रकल्पांमध्ये गेलेली आहे. आशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, नॉर्थ गोवा, साउथ गोवा, उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड या ठिकाणच्या उमेदवारांना द्वितीय प्राधान्य देण्यात येईल.

[ KRCL Bharti 2024 ] कोकण रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील पद्धतीने अर्ज करावा.

  • कोकण रेल्वे येथील KRCL Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवारांनी खालील गोष्टी अर्ज भरण्यापूर्वी तयार ठेवाव्यात.
  1. चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर.
  2. उमेदवाराकडे NATS पोर्टल वरील रजिस्टर डिटेल आणि एनरोलमेंट असणे आवश्यक आहे.
  3. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी फक्त कोकण रेल्वेच्या ऑफिशिअल वेबसाईट द्वारे अर्ज करायचा आहे.
  4. अर्ज भरायला सुरुवात करण्याअगोदर उमेदवारांनी सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचा.
  5. उमेदवारांनी सुरुवातीला तयार केलेल्या रजिस्ट्रेशन नंबर वरून अर्ज करायला सुरवात करायची आहे. रजिस्ट्रेशन नंबर उमेदवाराच्या मोबाईल नंबर वरती पाठवण्यात येईल.
  6. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला संपूर्ण अर्ज भरावा लागणार आणि त्यानंतर सबमिट करावा लागणार आहे.
  7. उमेदवारांनी स्वतःच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वर असलेले स्वतःचे नाव लिहायचे आहे. त्याचबरोबर वडिलांचे नाव सुद्धा तेच लिहायचे आहे.
  8. जर नावामध्ये कोणत्याही उमेदवाराने बदल केलेला असेल तर त्या उमेदवारांनी गॅजेट डॉक्युमेंट सादर करायचे आहे.
  9. उमेदवारांनी अर्ज मध्ये भरलेला ई-मेल आयडी चालू ठेवायचा आहे. आणि भरती प्रक्रिये दरम्यान सतत चेक करायचा आहे. कारण कोकण रेल्वे उमेदवारा सोबत ई-मेल द्वारे संवाद साधणार आहे.
  10. जा उमेदवारांची निवड यादी मध्ये नाव आले असणार आहे. आशा उमेदवारांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी उपस्थित राहावे लागणार आहे. डॉक्युमेंट वेरिफिकेशन करिता उमेदवारांनी सर्व डॉक्युमेंट ओरिजनल सोबत आणावे. त्याचबरोबर सर्व डॉक्युमेंट चे सत्य प्रती केलेले दोन सेट सोबत आणायचे आहेत.
  11. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दैनंदिन खर्च, प्रवासी खर्च, निवासी खर्च यापैकी कोणताही खर्च देण्यात येणार नाही.
  12. निवड झालेल्या उमेदवार जर स्वतःचेच ओरिजनल डॉक्युमेंट जमा करू शकला नाही. तर अशा उमेदवाराला निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
  • सदरील KRCL Bharti 2024  भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
  1. सर्व सेमिस्टर चे मार्कशीट
  2. डिग्री / डिप्लोमा सर्टिफिकेट
  3. 10वी बोर्ड सर्टिफिकेट
  4. जर लँड लुजर असेल तर SLAO द्वारे प्रमाणित केलेले लँड लुजर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  5. डोमासाईल सर्टिफिकेट
  6. जातीचा दाखला
  7. नॉन क्रिमिलियर
  8. इन्कम सर्टिफिकेट
  9. गॅजेट जर नावात बदल असेल तर
  10. दोन पासपोर्ट साईज फोटो
  11. आधार आणि पॅन कार्ड
  12. सर्व कागदपत्रांचे सत्यप्रती.
  • सदरील KRCL Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹ 200 असेल. SC / ST / PWD / महिला या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क शुन्य रुपये असणार आहे.

[ KRCL Bharti 2024 ] कोकण रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील महत्त्वाच्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • 2 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 2 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
  • वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • कोकण रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र येथे  भरती

Leave a Comment