GGMCJJH Bharti 2024 | नमस्कार मित्रांनो आज आपण सर जे.जे. समूह रुग्णालय येथे निघालेल्या ‘ डेटा एंट्री ऑपरेटर ‘ भरती संदर्भात माहिती पाहणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून एकूण 06 जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 8 ऑक्टोबर 2024 रोजी सदरील भरतीच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरती मधून ‘ डेटा एन्ट्री ऑपरेटर ‘ या पदाकरिता योग्य उमेदवाराची नेमणूक केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीच्या स्थळी उपस्थित राहायचे आहे. सर जे.जे. समूह रुग्णालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- सर जे.जे. समूह रुग्णालय येथील भरती मधून 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- “डेटा एंट्री ऑपरेटर” पदाकरिता सर जे.जे. समूह रुग्णालय येथे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
GGMCJJH Bharti 2024 | सर जे.जे. समूह रुग्णालय येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MS-CIT उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट असावे. तर इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट असावे.
- या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला परीक्षा शुल्क नाही.
- पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला दरमहा 10,000 रुपये वेतन मिळेल.
- सदरील भरती मधून ‘ डेटा एंट्री ऑपरेटर ‘ या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
- ‘ महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008.’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- सर जे.जे. समूह रुग्णालय यांच्याकडून सदरील भरती करिता प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
GGMCJJH Bharti 2024 | सर जे.जे. समूह रुग्णालय येथील भरतीसाठी आवश्यक नियम खालील प्रमाणे आहेत.
- सर जे.जे. समूह रुग्णालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी मुलाखतीला जाताना अर्ज सोबत घेऊन जायचे आहेत.
- सर जे.जे. समूह रुग्णालय यांच्याकडून ‘ डेटा एंट्री ऑपरेटर ‘ या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
- सर जे.जे. समूह रुग्णालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःची शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, संपूर्ण नाव आणि इतर तपशील योग्य आणि खरा लिहायचा आहे. जर यामध्ये काही चुकीचे आढळले तर संबंधित उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- 8 ऑक्टोबर 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. यानंतर येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार नाही.
- सदरील भरती करिता ज्या उमेदवारांना ‘ डेटा एंट्री ऑपरेटर’ या पदासाठी अर्ज करायचा आहे. आशा उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे.
GGMCJJH Bharti 2024 | सर जे.जे.समूह रुग्णालय येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.
- सर जे.जे.समूह रुग्णालय यांच्याकडून देण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी हजर राहता येईल.
- या भरती करिता मुलाखतीकरिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- मुलाखतीला आलेल्या कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला. तर त्या उमेदवाराला मुलाखत प्रक्रियेतून रद्द करण्यात येईल. आणि अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- कोणत्याही उमेदवाराने मुलाखतीला येण्यापूर्वी सर जे.जे.समूह रुग्णालय यांच्या बद्दल अधिक माहितीसाठी. रुग्णालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- सदरील भरती करिता अर्ज करण्याकरिता अर्ज जाहिरातीच्या शेवटी देण्यात आलेला आहे. तो अर्ज उमेदवारांनी पूर्ण भरायचा आहे.
GGMCJJH Bharti 2024 | सर जे.जे.समूह रुग्णालय येथील भरतीसाठी सर्वसाधारण अटी खालीलप्रमाणे.
- जाहिरातीत दिलेल्या ‘ डेटा एंट्री ऑपरेटर ‘ या पदाच्या जागा कमी जास्त होऊ शकतात.
- सदरील भरती मधून उमेदवारांची निवड कंत्राटी स्वरूपाची होणार आहे. कारण राज्य शासनाकडे सध्या रिक रिक्त जागा नाहीत.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे MS – CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने यापूर्वी संबंधित पदावर ती केलेल्या कामाचा अनुभव अर्जामध्ये नमूद करावा. असा अनुभव पद नियुक्तीसाठी ग्राह्य धरला जाईल.
- सदरील भरतीच्या जाहिराती मधील पदांची संख्या कमी करणे किंवा वाढवणे. सदरील भरती स्थगित करणे किंवा रद्द करणे. याबाबतचे सर्व अधिकार सर जे.जे.समूह रुग्णालय यांच्याकडे राखून आहेत.
- सदरील भरतीच्या निवडीच्या ठिकाणी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहणे गरजेचे आहे.
- भरतीसाठी मुलाखतीला येणाऱ्या सर्व उमेदवारांनी जाहिरातीत दिलेला भरलेला अर्ज आणि आवश्यक स्वयंसाहाय्यता कागदपत्रांच्या प्रती उमेदवारांनी घेऊन जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
- या भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांची निवड ही तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे. निवड झाल्यापासून उमेदवाराच्या नोकरीचा कालावधी 120 दिवसांचा असेल.
- पदावर नियुक्त केलेल्या उमेदवाराचे काम योग्य असेल तर आशा उमेदवाराला कामामध्ये एक दिवस खंड देऊन. त्याची नियुक्ती 364 दिवसापर्यंत चालू ठेवण्यात येईल.
- भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांची निवड निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. उमेदवाराला केव्हाही कामावरून कमी करता येऊ शकते. या नोकरीवर नियुक्त झालेला उमेदवार कायमस्वरूपी चा हक्क सांगू शकत नाही.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांना समान आणि निश्चित स्वरूपाचे वेतन देण्यात येईल.
- ‘ डेटा एन्ट्री ऑपरेटर’ या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना तीन शिफ्टमध्ये नोकरी राहील. पहिली शिफ्ट सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. दुसरी शिफ्ट दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल. तिसरी शिफ्ट रात्री 10:00 वाजल्यापासून सकाळी 8:00 पर्यंत राहील.
GGMCJJH Bharti 2024 | सर जे.जे.समूह रुग्णालय येथील भरतीसाठी अर्ज खालील पद्धतीने भरावा.
- भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज इंग्रजी भाषेमध्ये भरायचा आहे.
- सदरील भरतीच्या अर्जामध्ये उमेदवारांनी उजव्या कोपऱ्यामध्ये स्वतःचा रंगीत सध्याचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे.
- सदरील भरती चा अर्ज उमेदवारांनी “The Dean, Grant Gov. Medical College & Sir J.J. Group of Hospital, Byculla, Mumbai – 400 008′ यांच्या प्रति अर्ज पाठवायचा आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या विषयामध्ये ‘ डाटा एन्ट्री पदाकरिता अर्ज करत आहोत’ असे नमूद करावे.
- उमेदवाराने रेफरन्स मध्ये ज्या तारखेला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ती तारीख लिहायची आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे पूर्ण नाव, जन्मतारीख, परमनंट ऍड्रेस, करस्पाँडंट ऍड्रेस, मोबाईल नंबर, वैवाहिक स्टेटस, जेंडर, ई-मेल आयडी, शैक्षणिक पात्रता यासंदर्भातील संपूर्ण माहिती लिहायचे आहे. अर्जदाराने यापूर्वी केलेला कामाचा अनुभव सध्याच्या अर्जामध्ये लिहायचा आहे.