FDA Maharashtra Bharti 2024 | अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन येथे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

FDA Maharashtra Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र येथे निघालेल्या भरती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे 56 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता या भरतीचे आयोजन करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • महाराष्ट्र राज्य : अन्न व औषध प्रशासन विभाग येथील भरती मधून एकूण 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • महाराष्ट्र राज्य : अन्न व औषध प्रशासन विभाग येथील भरती मधून वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

जिल्हा परिषद अमरावती येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ FDA Maharashtra Bharti 2024 ] अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ ( गट- ब ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी मिळवलेली पाहिजे. किंवा जीव रसायनशास्त्र शाखेमधून पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे. सदरील शैक्षणिक पात्रता उमेदवाराची पूर्ण होत असेल तर उमेदवाराला कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची आवश्यकता नाही. या व्यतिरिक्त उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून विज्ञान शाखेची प्राप्त केलेली पदवी असेल आणि औषध द्रव्य विश्लेषणा मध्ये काम केलेला 18 महिन्याचा अनुभव असेल तर तो उमेदवार या पदासाठी अर्ज करायला पात्र असेल.
  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक ( गट- क ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणी पदवी मिळवलेली पाहिजे. किंवा औषध निर्माण शास्त्रामध्ये पदवी मिळवलेली पाहिजे. असा उमेदवार सदरील पदासाठी अर्ज करू शकतो.
  • सदरील भरतीसाठी FDA Maharashtra Bharti 2024 अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय अर्ज करायचा अंतिम दिनांकापर्यंत 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. किंवा 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागास प्रवर्गातील, खेळाडू प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आशा उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे. अर्ज करणाऱ्या दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांकरिता वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता वय मर्यादा 55 वर्षापर्यंत आहे. अर्ज करणाऱ्या भूकंपग्रस्त उमेदवारा करिता वय मर्यादा 45 वर्षे राहील.
  • अर्ज करणारा उमेदवार मागासवर्गीय, दिव्यांग किंवा खेळाडू या तीनही प्रवर्गात बसत असेल तर त्या उमेदवाराला कोणत्याही एकाच प्रवर्गाची वय मर्यादा असेल.
  • या भरती FDA Maharashtra Bharti 2024  मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे.
  • या भरती मधून पदावर नेमणूक करण्यात आलेल्या उमेदवाराला दरमहा 38,600 ते 1,22,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • अन्न आणि औषध प्रशासन विभाग येथील होणाऱ्या भरती करिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क ₹ 1000 राहील. राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता शुल्क 100 रुपये राहील.
  • सदरील भरती FDA Maharashtra Bharti 2024 मधून पदावर नेमणूक होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
  • अन्न व औषध प्रशासन विभाग येथील भरतीसाठी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

[ FDA Maharashtra Bharti 2024 ] अन्न व औषध प्रशासन विभाग येथील भरतीसाठी अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • आयुक्त, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय द्वारे जाहिरात क्रमांक 1 / 2024 प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजी नगर येथे असणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
  • FDA Maharashtra Bharti 2024 या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आलेल्या ऑनलाइन संकेतस्थळाद्वारे अर्ज करायचा आहे. 23 सप्टेंबर 2024 रात्री 11 वाजल्यापासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे. 22 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • FDA Maharashtra Bharti 2024 या भरतीसाठी परीक्षा शुल्क उमेदवार 23 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12:00 वाजेपर्यंत भरू शकतो.
  • ऑनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर सदरील परीक्षेचे प्रवेश पत्र संकेतस्थळावर देण्यात येईल.
  • परीक्षा ची तारीख ऑनलाईन वेबसाईट द्वारे जाहीर करण्यात येईल.
  • सदरील भरती मधील दोन्ही पदांकरिता परीक्षा वेगवेगळ्या घेण्यात येतील. दोन्ही परीक्षेची वेळ बदलल्यावर त्याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांनी संकेत स्थळाला वारंवार भेट देत राहावी.
  • जर उमेदवारांची संख्या जास्त असेल तर परीक्षा दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये घेण्यात येईल.

[ FDA Maharashtra Bharti 2024 ] अन्न व औषध प्रशासन विभाग येथील भरतीसाठी आरक्षण आणि तरतुदी खालील प्रमाणे.

  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी एकूण 37 जागा रिक्त आहेत. विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदासाठी एकूण 19 जागा रिक्त आहेत.
  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदाच्या एकूण जागांमधील पाच जागा अनुसूचित जातीसाठी आहेत. दोन जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत. एक जागा विमुक्त जाती ( अ ) साठी आहेत. एक जागा भटक्या जमाती ( ब ) साठी आहेत. दोन जागा भटक्या जमाती ( क ) या प्रवर्गासाठी आहेत. भटक्या जमाती ( ड ) या प्रवर्गासाठी एकही जागा नाही. विविध मागास प्रवर्ग यांच्यासाठी एक जागा आहे. इतर मागासवर्ग करिता सहा जागा आहेत. सा. व. शै. मा. या प्रवर्गासाठी एकूण चार जागा आहेत. आर्थिक दुर्बल घटकांकरिता चार जागा रिक्त आहेत. एकूण आरक्षित पदांसाठी 26 जागा रिक्त आहेत. एकूण 11 अराखीव पदे आहेत.
  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी समांतर आरक्षण आहे. महिलांसाठी 30 टक्के आरक्षण आहे. माजी सैनिकांसाठी एकूण जागेच्या 15 टक्के आरक्षण आहे. अंशकालीन पदवीधरांसाठी FDA Maharashtra Bharti 2024 एकूण जागेच्या 10% आरक्षण आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी एकूण जागेच्या 5% आरक्षण आहे. खेळाडूंसाठी एकूण पाच टक्के आरक्षण आहे. भूकंपग्रस्तांसाठी 2% आरक्षण आहे. अनाथ उमेदवारांसाठी शून्य जागा आहेत. तर दिव्यांग उमेदवारांसाठी एक जागा रिक्त आहे.
  • दिव्यांगा मध्येच स्वमग्नता, Autism, मंदबुद्धी, आकलन क्षमतेची कमतरता, मानसिक आजार अशा प्रकारच्या उमेदवारांकरिता एक जागा रिक्त आहे.
  • विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदासाठी एकूण 19 रिक्त जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 01 जागा आहे. अनुसूचित जमाती करिता 01 जागा आहे. विमुक्त जाती ( अ ) यांच्यासाठी एक जागा आहे. भटक्या जमाती ( ब ) यांच्यासाठी एक जागा रिक्त आहे. भटक्या जमाती ( क ) यांच्याकरिता एक जागा रिक्त आहे. भटक्या जमाती ( ड ) यांच्यासाठी एकूण शून्य जागा रिक्त आहेत. इतर मागासवर्ग करिता 04 जागा रिक्त आहेत. सा. व. शै. मा. प्रवर्गासाठी दोन जागा रिक्त आहेत. आर्थिक दुर्बल घटकांकरिता 02 जागा रिक्त आहेत. एकूण 13 आरक्षित जागा आहेत.
  • विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदासाठी समांतर आरक्षणाचे विवरण पुढील प्रमाणे. महिलांसाठी 30 टक्के आरक्षण आहे, खेळाडूंसाठी 5% आरक्षण आहे, दिव्यांग उमेदवारांसाठी एक टक्के आरक्षण आहे . कर्णबधिर किंवा ऐकू येण्यास दुर्बलता असणाऱ्या उमेदवारा करिता एक जागा रिक्त आहे.

[ FDA Maharashtra Bharti 2024 ] अन्न व औषध प्रशासन विभाग येथील भरतीसाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे.

  • सदरील भरती FDA Maharashtra Bharti 2024 मधून भरण्यात येणाऱ्या पदांचे सामाजिक आणि समांतर व पद संख्या यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
  • सदरील भरती मधील राखीव आणि बिन राखीव पदांच्या संख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आरक्षणा मधील संबंधित प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील इतर पात्र उमेदवाराची निवड करून त्याला पदावर नियुक्त करण्यात येईल.
  • सामाजिक आरक्षणातील प्रवर्गातील जर उमेदवार उपलब्ध झाला नाही तर त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी देण्यात येईल.
  • वरील भरती मधील दोन्ही पदांसाठी स्वतंत्रपणे वेळापत्रक वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येईल.
  • प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आल्यावर संकेतस्थळावरती त्याबाबत माहिती देण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये देण्यात येणाऱ्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण केलेली असावी.
  • सदरील भरतीची परीक्षा रद्द करणे, स्थगित करणे, या परीक्षेमध्ये बदल करणे, पदांची संख्या कमी जास्त करणे याबाबतचे सर्व अधिकार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे राहतील.
  • वरील लिहिलेल्या लेखांमध्ये संबंधित भरती बाबत माहिती अपूर्ण असू शकते.
  • अन्न व औषध प्रशासन विभाग  येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

[ FDA Maharashtra Bharti 2024 ] अन्न व औषध प्रशासन विभाग  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • 23 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
  • 22 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 22 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • FDA Maharashtra Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
  • या भरतीसाठी परीक्षेला येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला प्रवासी आणि निवासी खर्च देण्यात येणार नाही. उमेदवारांनी स्वखर्चाने परीक्षेसाठी यायचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी माजी सैनिक असणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क शून्य राहील.
  • ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरत असताना उमेदवारांना शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच इतर देय रक्कम द्यावी लागेल.
  • http://www.fda.maharashtra.gov.in/   या संकेतस्थळावर भरती विषयक असणाऱ्या सर्व अपडेट्स वेळापत्रक, भरती मध्ये झालेले बदल प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांनी या संकेतस्थळाला वारंवार भेट देणे गरजेचे आहे.

Leave a Comment