DMRC Bharti 2024 | दिल्ली मेट्रो येथे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

DMRC Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण दिल्ली मेट्रो येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. या भरती मधून सुपरवायझर, ज्युनियर इंजिनिअर, असिस्टंट सेक्शन इंजिनियर, सीनियर सेक्शन इंजिनियर या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 8 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 09 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ईमेलद्वारे अर्ज करायचा आहे. सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी दिल्ली मेट्रो यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. खाली देण्यात आलेला लेख उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावा.

  • 09 रिक्त जागांकरिता दिल्ली मेट्रो यांच्याकडून भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • सुपरवायझर, ज्युनियर इंजिनिअर, असिस्टंट सेक्शन इंजिनियर, सीनियर सेक्शन इंजिनियर या पदांकरिता सदरील भरती मधील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे भरती

DMRC Bharti 2024 | दिल्ली मेट्रो येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • सुपरवायझर ( PST ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून तीन वर्षाचा पूर्ण वेळ डिप्लोमा इलेक्ट्रिकल शाखेमधून उत्तीर्ण केलेला असावा.

     

  • टेक्निशियन ( PST ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी किंवा 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवारांनी NCVT / SCVT मान्यता प्राप्त संस्थेमधून आयटीआय पदवी इलेक्ट्रिशियन / फिटर / केबल जॉइंटर या शाखेमधून उत्तीर्ण केलेली असावी.

     

  • सुपरवायझर (Signaling & Telecom ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून तीन वर्षाचा पूर्णवेळ डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यापैकी कोणत्याही शाखेचा डिप्लोमा उमेदवाराने उत्तीर्ण केलेला असावा.

     

  • सुपरवायझर ( रोलिंग स्टॉक ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून तीन वर्षे अभ्यासक्रमाचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या शाखेमधून पूर्णवेळ अभ्यासक्रमाने उत्तीर्ण केलेला असावा.

     

  • टेक्निशियन ( ट्रॅक ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय पदवी प्लंबर शाखेमधून उत्तीर्ण केलेली असावी.
  • सदरील DMRC Bharti 2024  भरतीसाठी सुपरवायझर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 ते 40 वर्षापर्यंत असावे. टेक्निशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ते 35 वर्षापर्यंत असावे. सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संबंधित कामाचा पाच वर्षाचा अनुभव असावा. त्यामधील तीन वर्षे त्याने मेट्रो किंवा रेल्वे मध्ये काम केलेले असावे. यावेळेस त्या उमेदवाराला वार्षिक वेतन 6 लाख किंवा त्यापेक्षा अधिक असावे. या भरती मधील उमेदवाराचा अनुभव सुपरवायझर कामाचा असावा. जे उमेदवार सध्या मुंबई / महाराष्ट्र मध्ये काम करत आहेत अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

     

  • सदरील DMRC Bharti 2024  भरती मधून टेक्निशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता पाच वर्षे कामाचा अनुभव उमेदवाराकडे असावा. पाच वर्षांमधील तीन वर्ष उमेदवाराने मेट्रो / रेल्वे मध्ये काम केले असावे. त्याचप्रमाणे उमेदवाराला संबंधित कामात 4 लाख रुपये पेक्षा अधिक वेतन असावे. महाराष्ट्र आणि मुंबई मध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

     

  • टेक्निशियन या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 46000 वेतन देण्यात येईल. तर सुपरवायझर पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 65000 वेतन देण्यात येईल.
  • पदावर नियुक्त होण्यासाठी सर्व उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. संस्थे कडून देण्यात आलेल्या वैद्यकीय प्रमाण उमेदवारांना मान्य असणे गरजेचे आहे. वैद्यकीय चाचणी बद्दल अधिक माहिती दिल्ली मेट्रोच्या संकेतस्थळाला उपस्थित आहे उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी भेट देण्यासाठी www.delhimetrorail.com या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. जर पहिल्यांदाच मेडिकल चाचणीला उमेदवार उपस्थित राहिला नाही तर आशा उमेदवाराला पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी करिता उपस्थित राहावे लागेल.

     

  • सदरील DMRC Bharti 2024  भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना कॉर्पोरेशन कडून तीन वर्षाची ट्रेनिंग देण्यात येणार आहे. उमेदवाराला यादरम्यान पेमेंट द्यावे लागणार आहे. जर उमेदवाराला सदरील भरती मधून काम सोडून जायचे असेल तर एक महिने अगोदर कॉर्पोरेशनला कळवणे गरजेचे आहे. या भरतीच्या ट्रेनिंग चे कॉस्ट पदानुसार वेगवेगळे असेल.

DNRC Bharti 2024 | दिल्ली मेट्रो येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • दिल्ली मेट्रो येथील DMRC Bharti 2024  भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑफलाईन पत्राद्वारे दिलेल्या पत्त्यावर किंवा ऑनलाईन ई-मेल द्वारे दिलेल्या ईमेल आयडी वरती अर्ज करू शकतात.

     

  • दिल्ली मेट्रो यांच्याकडून ऑनलाइन वेबसाईट द्वारे किंवा इतर ऑनलाईन पोर्टल द्वारे अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी अशा कोणत्याही फसव्या वेबसाइटवरून अर्ज करायला चा प्रयत्न करू नये.

     

  • सदरील DMRC Bharti 2024  भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने किंवा ईमेलद्वारे अर्ज करत असताना अर्जाचा नमुना जाहिरातीच्या शेवटी देण्यात आलेला आहे. त्या नमुन्यामध्ये उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कोणत्याही प्रकारची खडाखोड उमेदवारांनी करू नये. अपूर्ण अर्ज उमेदवारांनी भरू नयेत. अपूर्ण अर्ज भरणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

     

  • 8 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर उमेदवार अर्ज करू शकत नाहीत कारण ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.

     

  • सदरील DMRC Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम दिल्ली मेट्रो यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरचा अर्ज करायला घ्यावा.
  • दिल्ली मेट्रो यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरातीची पीडीएफ पाहण्याकरिता उमेदवारांनी येथे क्लिक करा.

DNRC Bharti 2024 | दिल्ली मेट्रो येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • दिल्ली मेट्रो येथील DMRC Bharti 2024  भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज करायच्या अंतिम दिनांकाच्या पूर्वी ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज केलेले आहेत. आशा उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल. इतर कोणत्याही उमेदवाराला संधी देण्यात येणार नाही.

     

  • दिल्ली मेट्रो येथील भरती मध्ये सहभागी होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराला दिल्ली मेट्रो या संस्थे कडून TA / DA देण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.

     

  • दिल्ली मेट्रो यांच्या DMRC Bharti 2024  भरतीमध्ये कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार करू नये. जर कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

     

  • दिल्ली मेट्रो यांच्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी.

DNRC Bharti 2024 | दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • जाहिरातीत दिलेला अर्ज भरून संपूर्ण कागदपत्रे त्याला जोडून सही करून स्पीड पोस्ट द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांनी 8 नोव्हेंबर 2024 या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर पोहोचवायचा आहे.

     

  • सदरील भरतीसाठी देण्यात आलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या शेवट देण्यात आलेला फॉर्म भरायचा आहे. त्यासोबत उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत. शिक्षण, कामाचा अनुभव, वेतन याच्या पुराव्या बद्दल संबंधित कागदपत्रे जोडायचे आहेत.

     

  • अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची पूर्तता केलेली असणे आणि नियम व अटींची मान्यता असल्याची खबरदारी घ्यायची आहे. चुकीची माहिती भरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जर पात्रतेची पूर्तता पूर्ण होत नसेल तर अर्ज करू नये. अशा प्रकारचे अर्ज करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल. किंवा पदावर नियुक्त झाल्यानंतर जर उमेदवाराने चुकीची माहिती दिलेली होती असे समजले तर त्या उमेदवाराला पदावरून कमी करण्यात येईल.

     

  • सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये उमेदवाराला जास्त वेळा आयडेंटि फोटोग्राफ चा उपयोग करावा लागणार आहे. अशा वेळेस उमेदवारांनी सारखे फोटो सगळीकडे वापरायचे आहेत.

     

  • अर्ज करताना वापरण्यात आलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर उमेदवारांनी भरतीची प्रक्रिया सुरू असेपर्यंत चालू ठेवायचा आहे. याद्वारे उमेदवाराशी संभाषण साधले जाईल.

     

  • उमेदवाराला कोणत्याही पातळीवर जर अन्याय झालेला असेल असे वाटत असेल तर संबंधित न्यायालयीन दखल ही दिल्ली येथील कोर्ट मध्ये घेण्यात येईल.

     

  • DMRC Bharti 2024  भरतीच्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी दबाव तंत्राचा उपयोग करून पदावर नियुक्त होण्याकरिता कॉर्पोरेशन ला प्रोत्साहन देऊ नये. असे करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

Leave a Comment