MPSC Group C Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत निघालेल्या गट क पदांच्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून 1333 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ‘ गट क’ विभागातील उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बेलीफ व लीपिक गट क, नगरपाल ( शेरीफ ), लिपिक- टंकलेखक यांसारख्या पदासाठी सदरील भरती द्वारे निवडण्यात येणार आहेत. 4 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. सदरची भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरती करिता उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती करिता खालील लिहिण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.
- 1333 जागांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत भरती निघालेली आहे.
- उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बेलीफ व लीपिक गट क, नगरपाल ( शेरीफ ), लिपिक- टंकलेखक या पदांकरिता ‘ गट क ‘ प्रवर्गातील उमेदवार भरण्यात येणार आहेत.
हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोग येथे भरती.
MPSC Group C Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील गट क भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- उद्योग निरीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजीनियरिंग शाखेमधून पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. किंवा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला पाहिजे. किंवा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विज्ञान शाखेमधील पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- कर सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे मराठी टंकलेखन 30 प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे.
- तांत्रिक सहाय्यक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- बेलीफ ऑलिम्पिक, नगरपाल ( शरीफ ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराचा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी शब्द टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे.
- लिपिक- टंकलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही विषयाची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराचा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रतिमिनिट असणे गरजेचे आहे. इंग्रजी टंकलेखनाचा वेग काही शब्द प्रतिमिनिट असणे गरजेचे आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
- उद्योग निरीक्षक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता वेतन 35400 ते 112400 रुपये दरमहा असणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराला महागाई भत्ता व इतर भत्ता मिळणार आहे.
- कर सहाय्यक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 25500 रुपये ते 81100 रुपये वेतन मिळणार आहे.
- तांत्रिक सहाय्यक या पदाकरिता उमेदवारांना 29200 ते 92300 रुपये वेतन मिळणार आहे.
- बेलीफ व लीपिक, गट क, नगरपाल ( शेरीफ ) मुंबई यांचे कार्यालय या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 19900 ते 63200 रुपये वेतन मिळणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराला महागाई भत्ता व इतर नियमित भत्ते मिळणार आहेत.
- लिपिक- टंकलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या 19900 ते 63200 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे.
- सदरील MPSC Group C Bharti 2024 भरती मधील एकूण जागेच्या संख्येमध्ये आणि पदांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. हा बदल करण्याचा पूर्णपणे अधिकार सदरील संस्थेला आहे.
- सदरील MPSC Group C Bharti 2024 भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर आशा उमेदवारा संदर्भात सामाजिक प्रवर्ग, महिला, प्राविण्य प्राप्त खेळाडू, अनाथ यापैकी कुठल्याही प्रवर्गातील उमेदवारांना शासनाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार आरक्षण मिळणार आहे.
- सदरची भरतीसाठी आरक्षण मिळवण्याकरिता उमेदवाराकडे संबंधित प्रवर्गाचे आवश्यक ते कागदपत्र आणि प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- सदरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती करिता अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
- सदरील MPSC Group C Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2025 या तारखेपासून मोजण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता कमीत कमी वय मर्यादा पुढील प्रमाणे आहे. उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता 19 वर्ष कमीत कमी वय आहे. तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता कमीत कमी वय 19 वर्षापर्यंत आहे. कर सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमीत कमी वय 18 वर्षापर्यंत आहे. बेलीफ व लीपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी 19 वर्षे कमीत कमी वय आहे. लिपिक- टंकलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमीत कमी वय 19 वर्ष असावे.
- सदरील MPSC Group C Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता जास्तीत जास्त वय मर्यादा पुढील प्रमाणे आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील सर्व उमेदवारांकरिता आणि सर्व पदांकरिता जास्तीत जास्त वय मर्यादा 38 वर्षापर्यंत आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत आहे. प्राविण्य प्राप्त खेळाडू करिता वय मर्यादा 43 वर्षापर्यंत आहे. अर्ज करणाऱ्या दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय मर्यादा 45 वर्षांपर्यंत राहील.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क येथील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
MPSC Group C Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क येथील भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने किंवा पत्राद्वारे अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी पत्राद्वारे अर्ज करण्याचा प्रयत्न करू नये.
- सदरील MPSC Group C Bharti 2024 भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आणि बरोबर लिहायचे आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- 4 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेला कोणताही ऑनलाइन पद्धतीचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- गट क वर्गातील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात पाहण्यासाठी उमेदवारांनी देण्यात आलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.
MPSC Group C Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहे आशा उमेदवारांना समाविष्ट करून घेण्यात येईल. अर्ज न करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला पदावर नियुक्त करता येणार नाही.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा करिता येण्याकरिता किंवा मुलाखतीसाठी येताना किंवा कागद पडताळणी साठी येताना स्वखर्चाने यायचे आहे. याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.
- 4 नोव्हेंबर 2024 या तारखेच्या आधी उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या वेबसाईट द्वारे अर्ज भरायचा आहे.
- सदरील भरती प्रक्रिया मधून मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी मुलाखतीला येताना फॉर्मल ड्रेस मध्ये यायचे आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून भरती प्रक्रियेमध्ये अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारां वरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार करू नये.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.