HURL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथील 212 जागांसाठी निघालेल्या भरती संदर्भात योग्य माहिती जाणून घेणार आहोत. हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथील भरती मधून 212 जागा भरल्या जाणार आहेत. 21 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. “पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा अभियंता प्रशिक्षणार्थी” या पदांकरिता योग्य उमेदवार सदरील भरती मधून निवडले जाणार आहेत. या भरती करता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- 212 रिक्त जागांकरिता हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड यांच्याकडून भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा अभियंता प्रशिक्षणार्थी या पदांकरिता योग्य उमेदवार हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड यांच्याकडून निवडले जाणार आहेत.
ECGC लिमिटेड येथे नोकरीची सुवर्णसंधी.
HURL Bharti 2024 | हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- पदवीधर प्रशिक्षणार्थी अभियंता ( केमिकल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी करा के मान्यताप्राप्त संस्थेमधून केमिकल इंजीनियरिंग / केमिकल टेक्नॉलॉजी / केमिकल प्रोसेस टेक्नॉलॉजी या शाखेमधून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- पदवीधर प्रशिक्षणार्थी इन्स्ट्रुमेंटेशन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल / इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल या शाखेची अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
- पदवीधर प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या शाखेमधून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- पदवीधर प्रशिक्षणार्थी मेकॅनिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- डिप्लोमा प्रशिक्षणार्थी ( केमिकल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून केमिकल इंजीनियरिंग / केमिकल टेक्नॉलॉजी / केमिकल प्रोसेस टेक्नॉलॉजी या शाखांमधून डिप्लोमा पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी बीएससी पदवी तीन वर्ष पूर्णवेळ अभ्यासक्रमातून फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयासह उत्तीर्ण केली पाहिजे.
- डिप्लोमा प्रशिक्षणार्थी ( इन्स्ट्रुमेंटेशन ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल / इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक अँड कंट्रोल इंजीनियरिंग या शाखेमधून डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.
- पात्रता उत्तीर्ण केलेल्या सर्व उमेदवारांनी भारतीय विद्यापीठातून पदवी किंवा पदविका धारण केलेली असावी.
- ज्या उमेदवारांना 60% पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत आशा उमेदवारांना GET पोस्ट करिता अर्ज करता येणार नाही.
- ज्या उमेदवारांना 50% पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत असे उमेदवार DET पदाकरिता अर्ज करू शकत नाहीत.
- जे उमेदवार सध्या हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथे काम करत आहेत असे उमेदवार जर सदरील भरती ची पात्रता पूर्ण करत असतील तर अशा उमेदवारांना भरती करिता अर्ज करता येईल.
- जाहिरातीमध्ये जी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे त्याच्या समतुल्य शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे गुण CGPA मध्य देण्यात आलेल्या असतील तर CGPA चे रूपांतर टक्केवारी मध्ये विद्यापीठाच्या नियमानुसार केले जातील.
- कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस उमेदवारांनी शैक्षणिक पात्रते संदर्भातील सर्व पुरावे द्यायचे आहेत.
- सदरील भरती मधील सर्व पदांकरिता आवश्यक जॉब प्रोफाइल https://www.hurl.net.in/ वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
- सदरील भरती मधील जागा गरजेनुसार कमी जास्त करण्यात येतील.
- GET पदाच्या उमेदवारांकरिता दरमहा वेतन 40,000 रुपये राहील.
- DET पदाच्या उमेदवारांकरिता दरमहा वेतन 23,000 रुपये राहील.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना कमीत कमी एक वर्ष प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागेल. ज्या उमेदवारांची प्रशिक्षण कालावधी मध्ये सेवा समाधानकारक नसणार आहे अशा उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी वाढवण्यात येईल. आणि कंपनीच्या नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. प्रशिक्षण कालावधी पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांना सेवेवर रुजू करता येणार नाही.
- पदवीधर प्रशिक्षणार्थी उमेदवारांना सेवेमध्ये नियमित स्वरूपाने रुजू होण्याकरिता 4,50,000 रुपयांचा करार कंपनीसोबत करावा लागणार आहे. हा करार तीन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर करण्यात येईल.
- डिप्लोमा प्रशिक्षणार्थी या पदावरील उमेदवारांना नियमित सेवेमध्ये रुजू होण्याकरिता 200,000 रुपयांच्या करारावर सही करावी लागेल. हा करार उमेदवाराला तीन वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर करावा लागणार आहे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराचे आरोग्य सदृढ असणे गरजेचे आहे. कंपनी जॉईन करण्यापूर्वी उमेदवाराला वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. उमेदवारांची वैद्यकीय तपासणी सिव्हिल सर्जन / चीफ मेडिकल ऑफिसर / इन चार्ज ऑफ गव्हर्मेंट हॉस्पिटल यांच्याद्वारे करण्यात येणार आहे.
- पदवीधर प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी वय 18 ते 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
- डिप्लोमा प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी वय मर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
- हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथील HURL Bharti 2024 भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथील HURL Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
HURL Bharti 2024 | हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथील HURL Bharti 2024 भरतीसाठी कंपनीकडून ऑनलाइन पोर्टल दिलेले आहे त्याद्वारेच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणती सुविधा देण्यात आलेली नाही.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना सर्व उमेदवारांनी स्वतःचा शैक्षणिक तपशील पात्रतेत दिलेला आहे त्याप्रमाणे भरायचा आहे. जर पात्र नसलेल्या उमेदवारांनी अर्ज केला तर आशा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड या पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची दिनांक 21 ऑक्टोबर 2024 ही आहे.
- हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर अर्ज करावा.
HURL Bharti 2024 | हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथील HURL Bharti 2024 भरतीसाठी प्रशिक्षणार्थी पदाचे उमेदवार पात्र असतील.
- हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथील भरतीसाठी कोणत्याही प्रशिक्षणार्थी उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
- सदरील भरती मध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार केला गेला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- जाहिराती मध्ये देण्यात आलेली वय मर्यादा मध्ये उमेदवार बसत असेल तरच उमेदवारांनी अर्ज करावा.
- हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथील HURL Bharti 2024 भरती संदर्भातील संपूर्ण माहिती संकेत स्थळावर देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड येथील HURL Bharti 2024 भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. उमेदवारांनी संपूर्ण माहिती जाणून येण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.