ECGC Bharti 2024 | ECGC लिमिटेड येथे 40 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

ECGC Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण ECGC लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या 40 जागांसाठी च्या भारतीय संदर्भात योग्य माहिती जाणून घेणार आहोत. ECGC लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरती मधून ‘ प्रोबेशनरी ऑफिसर ‘ या पदाकरिता योग्य उमेदवार निवडण्यात येणार आहेत. ECGC लिमिटेड या भरती मधून एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती करिता 13 ऑक्टोबर 2024 ही अंतिम दिनांक आहे. या भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • 40 रिक्त जागांसाठी ECGC लिमिटेड द्वारे भरती निघालेली आहे.
  • ‘ प्रोबेशनरी ऑफिसर ‘ या पदासाठी ECGC लिमिटेड यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे भरती.

ECGC Bharti 2024 | ECGC लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • ECGC लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता अधिक विस्तृतपणे समजून घेण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
  • SC / ST / अपंग या प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 175 रुपये असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसामान्य उमेदवारांकरिता शुल्क 900 रुपये असणार आहे.
  • 14 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांनी अर्जाचे शुल्क 13 ऑक्टोंबर 2024 या तारखे अगोदर जमा करायचे आहे.
  • भरतीसाठी आवश्यक कॉल लेटर उमेदवारांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळण्यास सुरुवात होईल.
  • 16 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
  • 16 डिसेंबर 31 डिसेंबर दरम्यान ऑनलाइन परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात येतील.
  • जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.
  • एससी प्रवर्गातील उमेदवारांकरिता एकूण सहा जागा रिक्त आहेत.
  • एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता एकूण चार जागा रिक्त आहेत.
  • ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता एकूण 11 जागा रिक्त आहेत.
  • EWS प्रवर्गातील उमेदवारांना एकूण 03 जागा रिक्त आहेत.
  • खुल्या गटातील उमेदवारांकरिता एकूण 16 जागा रिक्त आहेत.
  • सदरील ECGC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षे सूट असेल.
  • ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्षे सूट असेल.
  • पर्सन विथ बेंचमार्क डीसीबिलिटी या प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये 10 वर्षे सूट राहील.
  • माजी कर्मचारी असणाऱ्या उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्ष सूट राहील.
  • सदरील ECGC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा दोन भागांमध्ये घेण्यात येईल.
  • पहिली चाचणी ऑनलाइन बहुपर्यायी चाचणी असेल. तर दुसरी चाचणी लेखी चाचणी असेल.
  • ऑनलाइन बहुपर्यायी चाचणी 200 गुणांची असेल. त्यासाठी एकूण 200 प्रश्न असतील.
  • ऑनलाइन घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी चाचणी करिता रीजनिंग अबिलिटी, इंग्लिश लँग्वेज, कॉम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, कॉन्टॅटीव्ह ऐपटीट्यूड इत्यादी विषय असतील.
  • लेखी चाचणी मध्ये निबंध लिहिणे, तंतोतंत लेखन हे विषय असतील. याकरिता प्रत्येकी 20 गुण असतील.

ECGC Bharti 2024 | ECGC लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • ECGC लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ECGC लिमिटेड यांच्याद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
  • ECGC लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करत असताना संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे. कोणतीही माहिती चुकीची भरली गेली तर उमेदवाराचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर बाद होऊ शकतो. यासाठी उमेदवार स्वतः जबाबदार असणार आहे.
  • सदरील भरती करिता 13 ऑक्टोंबर 2024 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
  • ECGC यांच्याद्वारे जाहीर करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. जाहिरात पहा.

ECGC Bharti 2024 | ECGC लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • ECGC यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षे करिता ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत असे उमेदवार परीक्षा करिता पात्र असतील.
  • ECGC यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षे साठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कंपनीकडून TA / DA देण्यात येणार नाही.
  • ECGC लिमिटेड येथील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
  • संस्थे कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा करिता उमेदवारांनी फॉर्मल कपड्यावर येणे गरजेचे आहे.
  • सदरील ECGC Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला आशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

ECGC Bharti 2024 | ECGC लिमिटेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • ECGC लिमिटेड येथील परीक्षा करिता मुंबई / ठाणे / नवी मुंबई , अहमदाबाद / गांधीनगर, पुणे, इंदोर, नागपुर, कोलकाता, प्रयागराज, वाराणसी, भुबनेश्वर, रायपुर, गुवाहाटी, चेन्नई, कोइंबतूर, बेंगलोर, हैदराबाद, विजाग, दिल्ली / नोएडा / गुडगाव, चंदिगड / मोहाली, कानपूर / पटना, रांची, जयपुर या ठिकाणी परीक्षा केंद्र असतील.
  • उमेदवारांना मिळालेले परीक्षा केंद्र बदलण्यासाठी उमेदवारांनी विनंती करू नये.
  • वरती नमूद करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांमध्ये नवीन परीक्षा केंद्र वाढवण्याचे किंवा कमी करण्याचा पूर्णपणे हक्क कंपनीकडे राहील.
  • उमेदवारांनी परीक्षा करिता येताना स्वतःच्या खर्चाने यायचे आहे. याकरिता कंपनीकडून कोणताही खर्च देण्यात येणार नाही.
  • परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असताना उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार केला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील ECGC Bharti 2024 भरती मधील उमेदवारांना लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी या सर्व प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
  • घेण्यात येणाऱ्या मुलाखतीसाठी एकूण 60 गुण असतील. उमेदवारांना पात्र होण्याकरिता एकूण गुणांच्या 40% गुण मिळणे आवश्यक आहे. एससी / एसटी / ओबीसी / अपंग प्रवर्गातील उमेदवारांना पात्र होण्याकरिता 35% गुण मिळणे आवश्यक आहे.
  • पदावर नियुक्त होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही मध्ये पात्र होणे गरजेचे आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना पुढील कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.
  • कॉल लेटर ची प्रिंट, एप्लीकेशन फॉर्म ची प्रिंट, जन्मतारखेचा पुरावा म्हणून 10 वी बोर्ड सर्टिफिकेट ची प्रिंट, आयडेंटि फोटो, कास्ट सर्टिफिकेट, अपंग उमेदवारांकरिता अपंगत्वाचा दाखला ही सर्व कागदपत्रे उमेदवारांनी मुलाखती करता येताना घेऊन यायचे आहेत.
  • जर उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणली नसतील तर अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रवेश दिला जाणार नाही.
  • उमेदवाराची आयडेंटी व्हेरिफाय करताना संपूर्ण कागदपत्रे पडताळली जातील. बायोमेट्रिक वेरिफिकेशन केले जाईल.
  • बॉल पेन, परीक्षेसंबंधी कागदपत्रे एवढ्या वस्तू उमेदवारांना परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येतील.
  • कोरे कागद, जॉमेट्री बॉक्स, पेन्सिल बॉक्स, प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, पट्टी, रायटिंग पॅड, पेन ड्राईव्ह, लॉंग टेबल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट यापैकी कोणतीही वस्तू उमेदवाराला परीक्षेसाठी घेऊन बसता येणार नाही.
  • ब्लूटूथ, इयरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड यापैकी कोणतीही वस्तू उमेदवार परीक्षा करता घेऊन बसू शकत नाहीत.
  • गॉगल, हॅन्ड बॅग, हेअर पिन, गळ्यातील चैन किंवा नेकलेस, पेंडंट या गोष्टी उमेदवाराला परीक्षा केंद्रावर घेऊन बसता येणार नाहीत.
  • घड्याळ, कॅमेरा, धातूच्या वस्तू, खाद्यपदार्थ, मोबाईल यासारख्या गोष्टी उमेदवाराला परीक्षा देताना बसता येणार नाहीत.
  • सदरील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ECGC द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment