MSSC Bharti 2024 | महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ येथे 19 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

MSSC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ येथील 19 जागांसाठी होणाऱ्या भरती संदर्भात माहिती काळजीपूर्वक जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ येथे निघालेल्या भरती मधून 19 जागा भरल्या जाणार आहेत. 11 ऑक्टोबर 2024 ही अंतिम दिनांक सदरील भरतीसाठी आहे. ‘ सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी ‘ या पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून होणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

  • 19 रिक्त जागा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याद्वारे भरण्यात येणार आहेत.
  • ‘ सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी ‘ या पदावर योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.

महिला व बालविकास विभाग भरती.

MSSC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या अटी खालीलप्रमाणे.

  • सदरील MSSC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार पोलीस निरीक्षक / सहाय्यक पोलीस निरीक्षक ( फक्त महा मुंबई मेट्रो साठी ) ( सशस्त्र / निःशस्त्र ) या महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या किंवा राज्य राखीव पोलीस बला मधून सेवानिवृत्त झालेला असावा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असली पाहिजे.
  • सदरील भरती मधील पदांसाठी त्या विभागामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि पोलीस खात्यामध्ये सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येईल.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांना दरमहा 45,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक या पदांकरिता दरमहा 35,000 रुपये वेतन असणार आहे.
  • सदरील MSSC Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्यात येणार नाही.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • ‘ पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर एक,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई 400 005’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • वरती दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
MSSC Bharti 2024
MSSC Bharti 2024
  • महा मुंबई मेट्रो रेल ( अंधेरी ते दहिसर , गुंडवली ते दहिसर ) या ठिकाणी एकूण चार जागा आवश्यक आहेत.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, आंबेजोगाई यासाठी एकूण 01 जागा रिक्त असतील.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर या ठिकाणी एक जागा रिक्त आहे.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अमरावती या ठिकाणी एक जागा रिक्त आहे.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला या ठिकाणी एक जागा रिक्त आहे.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया या ठिकाणी एक जागा रिक्त आहे.
  • इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपुर या ठिकाणी एकूण 02 जागा रिक्त आहेत.
  • वेस्टर्न कोलफिल्ड – नागपूर जिल्हा ( कामठी, कन्हान, इंदर, बल्लारशा ) या ठिकाणी एकूण 04 जागा रिक्त आहेत.
  • औष्णिक विद्युत केंद्र, परळी या ठिकाणी एकूण 01 जागा रिक्त आहेत.
  • टोरंट पावर, ठाणे या ठिकाणी एकूण 01 जागा रिक्त आहे.
  • रिन्यू वाइंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, बीड / धाराशिव या ठिकाणी एकूण 01 जागा रिक्त आहे.
  • कोकण एलएनजी लिमिटेड, आजानवेल, गुहागर, रत्नागिरी या ठिकाणी मिळून 01 जागा रिक्त आहे.
  • पुढील एक वर्षामध्ये मुंबई महानगर प्रदेश ( मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड ) या ठिकाणी नव्याने 10 जागा उपलब्ध होतील.
  • पुढील एक वर्षामध्ये मुंबई महानगर प्रदेश ( मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड ) या ठिकाणी नव्याने 10 जागा उपलब्ध होतील. सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार 30 सप्टेंबर 2024 रोजी 61 वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

MSSC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरतीसाठी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.

  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरतीसाठी असलेल्या उमेदवारांनी फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही प्रणाली देण्यात आलेली नाही.
  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःची जन्मतारीख, संपूर्ण नाव, शैक्षणिक पात्रता, अनुभव त्याचप्रमाणे इतर सर्व माहिती योग्य लिहायचे आहे. कोणतीही चुकीची माहिती लिहिलेली आढळल्यास उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि त्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
  • 11 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराला सदरील भरती करिता अर्ज करता येणार नाही.
  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

MSSC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत यापैकी योग्य उमेदवारच मुलाखतीसाठी पात्र असतील.
  • सदरील MSSC Bharti 2024 भरतीसाठी मुलाखतीला किंवा भरती प्रक्रियेला येण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
  • सदरील भरतीला मुलाखतीकरिता येणाऱ्या उमेदवारांनी फॉर्मल कपड्यांमध्ये यायचे आहे.
  • सदरील भरती दरम्यान कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला किंवा पदावर नियुक्त झाल्यानंतर अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्या उमेदवाराला पदावरून कमी करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि मुलाखतीचा पत्ता महाराष्ट्र राज्य सुरक्षा संरक्षण महामंडळ यांच्याद्वारे केलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

MSSC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची कर्तव्य खालील प्रमाणे.

  • पदावर नियुक्त असलेले महामंडळाचे सुरक्षा कर्मचारी यांच्यावर पर्यवेक्षण करणे. आणि सुरक्षा सुरक्षा कर्मचाऱ्यांचे नियंत्रण करून संरक्षणाची जबाबदारी पार पाडणे.
  • कामावर नियुक्त असताना सुरक्षा व्यवस्थेतील संभाव्य धोके लक्षात घेणे आणि त्यानुसार सुरक्षा कर्मचाऱ्यांना कायम सतर्क ठेवणे व त्यांच्याकडून कामे करून घेणे.
  • पदावर नियुक्त असलेले जे सुरक्षा कर्मचारी व्यवस्थित काम करत आहेत अशा सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे. मुख्य कार्यालयात सोबत बोलून त्यांना बक्षीस देण्याची मागणी करावी.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराच्या खाली असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची दररोज हजरी घेणे आणि HRMS प्रणाली मध्ये नोंदणी करणे.
  • ज्या सुरक्षा रक्षकांकडून शस्त्र आहे. अशा रक्षकांच्या शस्त्रांची देखभाल आणि दुरुस्ती वेळेवर करून घेणे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला महामंडळाद्वारे देण्यात आलेले अनुषंगिक काम करावे लागेल.

MSSC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.

  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज करण्याचा नमुना जाहिरातीच्या शेवटी देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी त्यानुसार अर्ज करावा.
  • 11 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून अर्ज करायचा आहे.
  • वैयक्तिक माहिती, शैक्षणिक कागदपत्रे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र / सेवानिवृत्त ओळखपत्र, निवृत्तीवेतन पुस्तकाची प्रत, फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड, मागील पाच वर्षाचे ACR ही कागदपत्रे उमेदवारांची अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.
  • उमेदवारांनी MSSC Bharti 2024 सदरील भरती चा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे ( सत्यप्रत ) एकत्रित करून दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहून जमा करायचे आहेत.
  • सदरील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचण्याकरिता जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment