IDBI Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण IDBI बँक येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून ” कार्यकारी ( विक्री आणि संचालन ) ” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सदरच्या होणाऱ्या भरती मधून 1000 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती करिता कर्ज करण्याची अंतिम दिनांक 16 नोव्हेंबर 2024 ही आहे. या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. IDBI बँक यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात इच्छुक असलेल्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खालील लिहिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- 1000 रिक्त जागा भरण्याकरिता IDBI बँक यांच्याकडून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- IDBI बँक येथील होणाऱ्या भरती मधून ” कार्यकारी ( विक्री आणि संचलन )” या पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती
IDBI Bank Bharti 2024 | IDBI बँक येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
- कार्यकारी ( विक्री आणि संचालन ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी फक्त डिप्लोमा उत्तीर्ण केलेला आहे असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र असणार नाहीत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय 20 वर्षापर्यंत असावे. तर उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 25 वर्षापर्यंत असावे. अर्ज करणारा उमेदवार 2 ऑक्टोबर 1999 या तारखेच्या आधी जन्मलेला नसावा. तर 1 ऑक्टोबर 2004 या तारखेनंतर जन्मलेला नसावा.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला पहिल्या वर्षी दरमहा 29,000 रुपये प्रतिमहा वेतन मिळणार आहे. तर दुसऱ्या वर्षी 31,000 रुपये प्रतिमहा वेतन मिळणार आहे.
- भरती मधून उमेदवारांची निवड ही कंत्राटी तत्वावर होणार आहे. पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमित स्वरूपाच्या उमेदवारां प्रमाणे कोणताही भत्ता मिळणार नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही सोयीसुविधा मिळणार नाहीत. याची त्यांनी नोंद घ्यावी.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांचा नोकरीचा कालावधी इतर कोणत्याही पोस्ट करिता अनुभव म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला बँकेच्या नियमानुसार पोस्टिंग देण्यात येईल. बँकेच्या कोणत्याही ऑफिसमध्ये किंवा डिपार्टमेंट मध्ये त्याला काम करावे लागणार आहे. बँकेच्या नियमानुसार उमेदवाराला काम करावे लागणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 1050 रुपये असणार आहे. त्याचप्रमाणे अर्ज करणाऱ्या SC / ST / PWBD प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 250 रुपये असणार आहे.
- एलिजिबिलिटी क्रायटेरिया यामध्ये शिक्षण आणि वय अनुसार कट ऑफ तारीख 1 ऑक्टोबर 2024 आहे. भरतीसाठी अर्ज करायची दिनांक 6 नोव्हेंबर 2024 आहे. अर्जामध्ये बदल करण्याची किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची दिनांक 7 नोव्हेंबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 आहे. या तारखे दरम्यानच उमेदवारांनी ऑनलाईन पेमेंट करायचे आहे. ऑनलाइन परीक्षेची तारीख 1 डिसेंबर 2024 ही आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त करणाऱ्या उमेदवारांकरिता 120 मार्काची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये 60 मार्क चे लॉजिकल रिझनिंग डाटा एनालिसिस अँड इंटरप्रेटेशन त्याचप्रमाणे 40 गुणांचे इंग्लिश लँग्वेज. 40 गुणाचे कॉन्टॅक्ट एटीट्यूड आणि 60 गुणांची जनरल अवेअरनेस या विषयांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
- उमेदवाराला परीक्षा मध्ये किती गुण मिळालेले आहेत त्याचप्रमाणे वेकेन्सी किती शिल्लक आहे यानुसार कट ऑफ तयार केला जाईल. आणि त्या कट ऑफ च्या यादीनुसार उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल.
- जोपर्यंत पर्सनल इंटरव्यू पूर्ण केला जात नाही . तोपर्यंत उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार नाही.
- ज्या उमेदवारांनी OT उत्तीर्ण केलेली आहे आशा उमेदवारांनाच पर्सनल इंटरव्यू साठी बोलवण्यात येणार आहे. कर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी जास्तीत जास्त उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्यात येणार आहे. 50% पेक्षा अधिक उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्यात येणार आहे.
- IDBI बँक येथील भरती करिता प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- IDBI बँक येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
IDBI Bank Bharti 2024 | IDBI बँक येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- IDBI बँक येथील भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईट द्वारे अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही फसव्या वेबसाईट द्वारे उमेदवारांनी आपले अर्ज करायचे नाहीत.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणती सुविधा IDBI यांच्याकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी IDBI बँक येथील भरतीसाठी बँकेच्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे नाहीत. इतर कोणत्याही पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे नाहीत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःची माहिती चुकीच्या पद्धतीने लिहायची नाही. चुकीच्या पद्धतीने माहिती लिहिणाऱ्या उमेदवारावर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अशा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.
- 16 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे.
- IDBI बँक येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर समजून घ्यावी आणि मगच अर्ज करायला सुरुवात करावा.